एकाच्या डोक्यात घातला दगड; दुसऱ्याला धरणात फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:11+5:30

वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

A stone laid on one's head; Another was thrown into a dam | एकाच्या डोक्यात घातला दगड; दुसऱ्याला धरणात फेकले

एकाच्या डोक्यात घातला दगड; दुसऱ्याला धरणात फेकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाटीपुरा येथील वैभव नाईक हत्याकांडातील आरोपी अद्यापही पसार आहेत. या घटनेची शाई वाळत नाही तोच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात युवकाचा दगड टाकून खून करण्यात आला. येळाबारा येथील वाघाडी धरणात एकाला गळा आवळून ठार केले व मृतदेह धरणात फेकला. 
वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास  पाेलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 
येळाबारा येथील खून हा गावातीलच व्यक्तीनी केला असावा असा अंदाज आहे. या खुनात आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त आहे. त्यांनी गळा आवळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह धरणात टाकला होता. नेमका कुठल्या कारणाने हा खून झाला, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. 
यवतमाळातील पांढरकवडा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात अज्ञात युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघड झाली. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मृत हा कळंब शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अजूनही त्याची खात्री झालेली नाही. या प्रकरणात संशयित म्हणून शेख शकील शेख हकील (३५) रा. इंदिरानगर याला ताब्यात घेतले आहे. मृतक व शकील हे दोघेही गांजाचे व्यसन करीत होते. परिसरात सोबतच राहत होते. रात्री त्यांच्यात गांजा पिल्यानंतर वाद झाला या वादात शकीलने दगड मृताच्या डोक्यात घातला असे सांगितले जाते. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. शकीलच्या हातावर रक्ताचे डाग आढळून आले. यावरूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. 
मध्यंतरीच्या काळात खुनाच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर मधल्या चार महिन्यात हे सत्र काहिसे थांबले, असे वाटत असतानाच आठवडाभराच्या काळात पुन्हा तीन खून झाले आहेत. त्यातील दोन खून काही तासांच्या अंतराने घडले आहे.  यावरून पुन्हा खुनाचे सत्र सुरू होते काय, अशी भीती नागरिकातून  व्यक्त  केली जात आहे. 

वैभव नाईक प्रकरणातील मारेकरी मोकाटच 
- जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वैभव नाईकचा पाटीपुरात खून झाला. त्याच्या बरोबर चाकू हल्ल्यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. जयभीम चौकात घडलेल्या या घटनेतील आरोपी अद्यापही पसार आहेत. तेलंगणातील आदिलाबाद येथे आरोपीच्या शोधासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतल्याचे समजते. सध्या शहर पोलीस ठाण्याचे तीन पथक स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस कर्मचारीही या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र तरीही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

 

Web Title: A stone laid on one's head; Another was thrown into a dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.