अंगणवाडीसेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 09:52 PM2019-06-03T21:52:17+5:302019-06-03T21:52:47+5:30
मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. २० सप्टेंबरला केंद्रशासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या मानधनवाढीसाठी अधिसूचना काढण्यात आली. मात्र ही वाढ अद्यापही लागू झाली नाही. इतर राज्यातील अंगणवाडीतार्इंना दिल्या जाणाऱ्या मानधनानुसार राज्यातील अंगणवाडीतार्इंना मानधन देण्यात यावे. पेन्शन अदा करण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांना देण्यात आले.
संघटनेच्या अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, संघटक सचिव राजू लोखंडे, नीलेश दातखिळे, जिल्हाध्यक्ष विजया सांगळे, उपाध्यक्ष हुकूमताई ठमके, अरूणा अलोने, लिला काळे, ज्योती कुलकर्णी, गंगाताई वाघमारे, चंदा लिंगनवार, माया पवार, माला क्षीरसागर, ज्योती येरेकार, निर्मला राठोड, सुरेखा पुसाटे, माला नंदूरकर, अनुसया थेरे, लता मोरे आदी उपस्थित होत्या.
कार्याध्यक्षांना श्रद्धांजली
अंगणवाडीसेविकांच्या संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारच्या मोर्चात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.