अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:10 AM2019-01-10T00:10:14+5:302019-01-10T00:10:57+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
भारतीय श्रमपरिषदेच्या शिफारसींची राज्य शासनाने अंमलबजावणी करीत अंगणवाडीतार्इंना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, कमीत कमी १८ हजार रुपये वेतन द्यावे, सहा हजार रुपये पेंशनसहित सामाजिक सुरक्षा द्यावी, एकात्मिक बालविकास योजनेच्या कोणत्याही कामाचे खासगीकरण करू नये, सामाजिक उपक्रमासाठी पुरेसा निधी द्यावा, केंद्राने जाहीर केलेली मानधन वाढ लागू करावी, अंगणवाड्यांचे वाढीव भाडे देण्यात यावे, टीएचआर बंद करून १२ रुपये प्रतिदिवस देण्यात यावा, थकीत देयके ताबडतोब द्यावी, वर्षातून १५ दिवसांची पगारी रजा मंजूर करावी, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उषा डंभारे, विजया सांगळे, ज्योती कुलकर्णी, मनीष इसाळकर, सविता कट्यारमल, पल्लवी रामटेके आदींसह जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
आयटक जनसंघाचा रास्ता रोको
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे ४३ कोटी असंघटित कामगार बेरोजगार झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक जनसंघाच्यावतीने यवतमाळातील स्थानिक बसस्थानक चौकात बुधवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणाचा निषेध करीत शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा अशीही मागणी करण्यात आली. यावेळी अब की बार जुमले के सरकारी हार अशा प्रकारचे नारे देण्यात आले. आंदोलनात संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, दिवाकर नागपुरे, ममता भालेराव, शोभा बांबल, सुभाशिनी धोंगडे, विजय ठाकरे, गया सावळकर, रचना जाधव आदी सहभागी झाले होते.