अबब...धनगरवाडीत मुलांनी राबविली निवडणूक प्रक्रिया; अन् मुलांनीच निवडला मुलांसाठी सरपंच
By विलास गावंडे | Published: September 15, 2023 06:20 PM2023-09-15T18:20:27+5:302023-09-15T18:20:36+5:30
गजानन अक्कलवार कळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या ...
गजानन अक्कलवार
कळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या चुकीचा लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते. यावर मात करण्यासाठी आतापासूनच शाळकरी मुलांना निवडणूक व त्याचे महत्व कळावे यासाठी धनगरवाडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एवढेच नाही तर मुलांनी मुलांसाठी लोकशाही पध्दतीने सरपंच आणि उपसरपंचाची निवडही केली.
आपला भारत देश लोकशाहीप्रधान आहे. निवडणूक ही या लोकशाहीची अविभाज्य महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे मुलांना आतापासूनच निवडणूक प्रक्रिया समजावी, यासाठी धनगरवाडीच्या बालगरीत बालग्रामसभेत सरपंच आणि उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. दीपक कांबळे यांना ९२ पैकी ५१ मते मिळाली. त्यामुळे त्यांना सरपंच तर मोहन जाधव याला उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.
मतदान म्हणजे काय? मतदान कसे आणि कोणाला केले जाते. मतदान करताना कुठल्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजे. निवडून येणाºया लोकप्रतिनिधींच्या काय जबाबदाºया असतात. याची माहीती मुलांना देण्यात आली. बालनगरीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची जबाबदारी योग्य पध्दतीने कोण हाताळणार याविषयी चर्चा करण्यात आली. सुरुवातीला दहा नावे पुढे आली. त्यानंतर पाच नावे अंतीम करण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी काय पात्रता असावी, हेसूध्दा मुलांनीच ठरविले. उमेदवार ठरल्यानंतर त्यांना शैक्षणिक स्वरुपातील निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. त्यानंतर खºया अर्थाने प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली. काही दिवस हा प्रचार चालला.
निवडणूकीच्या दिवशी मताधिकार बजावण्यासाठी मुले गोळा झाली. गावातील नागरिकही या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदान करताना यादीत नाव कसे शोधायचे. आपले ओखळपत्र दाखवावे लागते. बोटाला शाई लावावी लागते. आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या चिट्टीवर शिक्का अथवा बटन दाबून मतदान करावे लागते. मतदान कोणाला केले हे सांगायचे नसते. याची माहीती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया बॅलेट पेपरवर स्वत: राबविली.
मतमोजणीची प्रक्रिया गावातील मोठ्या मंडळीच्या पुढाकारातून पार पडली. विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले. जिंकलेल्या मुलाच्या नावाची घोषणा होताच मुलांनी मोठा जल्लोष केला. जिंकुन आलेल्या आपल्या सहकाºयांना गुलाल लावून, फेटा घालून, ताशा वाजवित गावातील नंदूभाऊच्या सायकलवर रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मतदान प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्याचे महत्व विषद करण्यासाठी या वास्तववादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा प्रत्यय मुलांना आला. यासाठी प्रणाली जाधव, धम्मानंद बोंदाडे यांचा पुढाकार होता.