आयटीआयसमोरून तरुणीचे बोरगाव धरणावर अपहरण

By admin | Published: April 13, 2017 12:55 AM2017-04-13T00:55:10+5:302017-04-13T00:55:10+5:30

येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोरून एका अल्पवयीन युवतीवर बळजबरीचा प्रयत्न करून नंतर

Abduction of woman on Borgaon dam from ITI | आयटीआयसमोरून तरुणीचे बोरगाव धरणावर अपहरण

आयटीआयसमोरून तरुणीचे बोरगाव धरणावर अपहरण

Next

 यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोरून एका अल्पवयीन युवतीवर बळजबरीचा प्रयत्न करून नंतर तिचे दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न दोन अज्ञात इसमांनी केला. सदर घटना मंगळवारी दुपारी घडली.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन युवती धामणगाव मार्गावरील एका विद्यालयात शिकते. मंगळवारी दुपारी ती विद्यालयासमोर असताना तिच्या भावाच्या मित्राने आपल्या एका सहकाऱ्यासह तिला मुलांच्या वसतिगृहाजवळ नेवून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेथून सदर युवतीने पळ काढून सायकलने घरी जात असताना परत या दोन आरोपींनी तिला रस्त्यात गाठले आणि तिचे तोंड दाबून बळजबरीने तिला दुचाकीवर बसवून बोरगाव डॅमजवळील जंगलात नेवून त्या ठिकाणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर मुलीने झटापट करून तेथून पळ काढला आणि ती कशीबशी महर्षी शाळेजवळ पोहोचली. त्या ठिकाणी चौकीदाराच्या मदतीने एका आॅटोत बसून आपल्या विद्यालयापर्यंत पोहोचून सायकलने घरी गेली. घाबरलेल्या या मुलीने संपूर्ण हकीकत आपल्या आईला सांगितली. तिच्या पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Abduction of woman on Borgaon dam from ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.