अभिजितचे मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:32 PM2017-10-14T23:32:09+5:302017-10-14T23:32:19+5:30

ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित टेकाम या सहावीतील विद्यार्थ्याचा खून झालेल्या अवस्थेत शनिवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Abhijeet's killer police stage | अभिजितचे मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात

अभिजितचे मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात

Next
ठळक मुद्देशाळकरी विद्यार्थ्याचा खून : सुरजनगर परिसरावरच फोकस, दहा जणांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित टेकाम या सहावीतील विद्यार्थ्याचा खून झालेल्या अवस्थेत शनिवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आतापर्यंत दहा ते बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात आल्याची माहिती आहे. तसेच खुनाचा धागाही पोलिसांना गवसला.
ट्युशन सुटल्यानंतर सायंकाळी अभिजित हा सुरजनगर परिसरात गेला कसा, त्याच्यासोबत नेमके किती जण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अभिजितची सायकल याच भागात आढळून आली. त्यावरून पोलिसांनी अभिजितच्या मारेकºयांचा शोध स्थानिक परिसरावरच केंद्रीत केला आहे. मारेकरी हे थिनर अथवा बॉन्डचा नशा करणारे असल्याचे स्पष्ट आहे. त्याच अनुषंगाने पोलीस पथकांनी तपास सुरू केला असून टोळीविरोधी पथकांनी सहा ते सात संशयितांना तर वडगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने चार जणांंना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र पोलिसांना अधिकृत कबुली मिळत नसल्याने या गुन्ह्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अभिजितचे खुनी शोधण्यासाठी सायबर शाखेतील तंत्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे. घटनास्थळावर बोटांंचे ठसे घेण्यासाठी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. श्वान प्रशिक्षणाला गेले असल्याने ते तपासाचे आयुध वापरण्यात आले नाही. मात्र पोलिसांच्या स्थानिक नेटवर्कच्या जोरावरच हा गुन्हा उघडकीस येईल, असा दावा एसडीपीओ पीयूष जगताप, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केला.
अल्पवयीन व्यसनाधीनतेकडे
शहरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहेत. विविध अमली पदार्थांचा नशा मुलांसाठी घातक ठरत आहे. त्याच प्रमाणेच मोबाईल व इंटरनेटचा अतिरेकी वापरही अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक आहे. कमी वयात प्रौढासारखे वागणारी मुले डोकेदुखी ठरत आहे. एकांताच्या शोधात शाळकरी मुले-मुली शहराबाहेर पडताना दिसत आहे. यातूनच गंभीर घटना होत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच गत आठवड्यात सामूहिक बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

Web Title: Abhijeet's killer police stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.