मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 09:29 PM2018-06-27T21:29:50+5:302018-06-27T21:31:10+5:30

बनावट पाईप विक्री प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याच्याविरुद्ध यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.

ACB crime on Maregaon API | मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा

मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे३० हजारांची लाच मागणे भोवले : पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क तक्रारकर्त्याचेच अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : बनावट पाईप विक्री प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याच्याविरुद्ध यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.
मारेगाव पोलिसांनी अलिकडेच बोअरवेलमध्ये बनावट पाईप टाकणाºया टोळीचा पदार्फाश केला. येथील शिवशक्ती बोअरवेल फर्मद्वारा पाईपवर नामांकित कंपनीचे स्टीकर लावून त्या बनावट पाईपची विक्री सुरू होती. याबाबत यवतमाळ येथील स्वस्तिक पाईप इंडस्ट्रिजचे संचालक जितेश पतीरा यांनी मारेगाव पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवशक्ती बोअर फर्मवर धाड टाकून १४ बनावट पाईप जप्त केले व फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, मारेगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याने या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराला ३० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात यवतमाळ एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून मंगळवारी सायंकाळी एसीबीने सापळा लावला. त्याची कुणकुण लागताच राऊतने पुरावा नष्ट करण्यासाठी तक्रारदाराजवळील रेकॉर्डर आणि मोबाईल हिसकावून घेतला. तक्रारदार व त्याच्या एका साथीदाराला स्वत:च्या खासगी वाहनात बसवून घेऊन तो मारेगावातून फरार झाला. मात्र तक्रारदार व त्याच्या सहकाºयाला काही अंतरावर सोडून देत तो आपल्या कुटुंबासह कुंभामार्गे पुढे निघून गेला.
एसीबीच्या पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून एपीआय राऊतविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व भादंविच्या कलम ३९२, ३६५, १८६, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राऊतच्या घराला ठोकले सील
आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत हा मारेगावातील सुरेश महाकुलकार यांच्या घरी किरायाने राहातो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्याच्या घराला सील ठोकले.

Web Title: ACB crime on Maregaon API

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा