पुसदच्या माळपठारावर लसीकरण मोहिमेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:31 AM2021-05-30T04:31:43+5:302021-05-30T04:31:43+5:30
पुसद : तालुक्यातील माळपठारावर कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. कुंभारी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन केले जात आहे. कोरोनाच्या ...
पुसद : तालुक्यातील माळपठारावर कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. कुंभारी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन केले जात आहे.
कोरोनाच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. शासन व प्रशासन लोकांमध्ये जागृती करीत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून माळपठारावर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. कुंभारी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित शिबिरात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या नेतृत्वात व सरपंच अर्चना दत्तात्रेय पवार यांच्या पुढाकाराने कुंभारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
शिबिरात गावातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून जागृती करण्यात आली. जवळपास २०० लोकांचे लसीकरण करण्यात आले. शिबिरात मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आदींचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच अर्चना पवार, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. सायली वाघमारे, प्रा.डॉ. डी.बी. पवार, डॉ. कल्याण गावंडे, भाऊ काकडे, ताई पचारे,
ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदींनी सहकार्य केले.