Accident: भीषण कार अपघातात जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:05 AM2022-04-04T05:05:23+5:302022-04-04T05:05:47+5:30

Accident: यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ  रविवारी रात्री घडली.

Accident: Former Zilla Parishad Construction Chairman dies in horrific car accident | Accident: भीषण कार अपघातात जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींचा मृत्यू

Accident: भीषण कार अपघातात जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींचा मृत्यू

Next

यवतमाळ- यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ  रविवारी रात्री घडली. सुभाष मधुकर ठोकळ रा चाणी कामठवाडा असे मृताचे नाव आहे. ते कारने यवतमाळ येथून गावी चानी कडे जाताना हा अपघात झाला. त्यांना गँभिर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ चे आमदार मदन येरावार यांच्यासह अनेक नेते मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.


सुभाष ठोकळ हे दहा वर्षे मुबई कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य होते. नंतर वडगाव लाडखेड जिल्हा परिषद सर्कल चे पाच वर्षे सदस्य होते, त्यांनी  जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माजी आमदार संदीप बाजोरिया गटाचे निष्ठावान म्हणून त्याची ओळख होती.

Web Title: Accident: Former Zilla Parishad Construction Chairman dies in horrific car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.