हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 10:13 AM2022-12-07T10:13:42+5:302022-12-07T10:17:37+5:30

पिकअप व्हॅनला धडक

Accident of police vehicle on Nagpur-Tuljapur road; driver injured | हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात, चालक जखमी

हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात, चालक जखमी

Next

महागाव (यवतमाळ) : नागपूर अधिवेशनासाठी निघालेले पोलिस वाहन नागपूर-तुळजापूर रस्त्यावर असलेल्या महागाव तालुक्यातील मुडाणा इंद्रायणी धाब्याजवळ पिकअप व्हॅनला समोरासमोर धडकल्याने जबर अपघात झाला. पोलिस वाहनाचे चालक बनसोडे यांना महागाव येथे उपचाराकरिता आणले आहे. त्यांच्या छातीला बराच मुका मार लागला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालक पोलिस शिपाई निर्दोष बनसोडे हे लातूर पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच १२ क्यूएफ ५०२६ घेऊन नागपूरला जाण्याकरिता निघाले होते. महागाव तालुक्यातील मुडाणा गावासमोर असलेल्या इंद्रायणी हॉटेलसमोर त्यांच्या वाहनाची पिकअप व्हॅनला (क्रमांक एमएच २० ईएल ८५१८) धडक बसली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिस वाहनाची एअर बॅग ओपन झाल्यामुळे चालक शिपाई बनसोडे हे थोडक्यात बचावले परंतु, त्यांच्या छातीला बराच मार लागला आहे. महागाव पोलिसांत उशिरावर लातूर पोलिसांकडून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पिकअप वाहन चालक जाग्यावरच वाहन सोडून फरार झाला आहे.

Web Title: Accident of police vehicle on Nagpur-Tuljapur road; driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.