दराटी ठाणेदाराच्या कारला अपघात; चार जण जखमी

By सुरेंद्र राऊत | Published: February 1, 2024 05:50 PM2024-02-01T17:50:02+5:302024-02-01T17:50:27+5:30

यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी मातोंडकर यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला.

Accident to Darati Thanedar's car; Four people were injured | दराटी ठाणेदाराच्या कारला अपघात; चार जण जखमी

प्रतिकात्मक फोटो...

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील दराटी ठाणेदार संजय मातोंडकर हे त्यांच्या खासगी कारने फुलसावंगी येथे जात असताना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अपघात झाला. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात प्रवासी घेऊन जाणारा ऑटोरिक्षा मातोंडकर यांच्या कारवर धडकला. यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी मातोंडकर यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला.

तक्रारीत नमूद केल्यानुसार ठाणेदार संजय मातोंडकर हे एमएच १६ डीजी २१२६ या कारमधून फुलसावंगीकडे जात होते. अमडापूर धरणाच्या बंधाऱ्यापुढे घमापूर शेतशिवारात एपी-०१-९८६५ या क्रमांकाचा ऑटो व ठाणेदारांची कार यात धडक झाली. त्यामध्ये ऑटोरिक्षा चालक, दोन पुरुष व दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. या अपघाताला ऑटोचालक जबाबदार असल्याचे सांगत चालक उमेश रामराव राठोड (३०) याच्या विरोधात कलम २७९, ३३७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.
 

Web Title: Accident to Darati Thanedar's car; Four people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.