उमेदवारांचा लेखाजोखा केंद्राबाहेर दिसेल

By admin | Published: February 15, 2017 02:53 AM2017-02-15T02:53:47+5:302017-02-15T02:53:47+5:30

जिल्ह्यात येत्या १६ व २१ फेब्रुवारीला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

Accounting of candidates will be seen outside the center | उमेदवारांचा लेखाजोखा केंद्राबाहेर दिसेल

उमेदवारांचा लेखाजोखा केंद्राबाहेर दिसेल

Next

जिल्हाधिकारी : मतदान केंद्रात मोबाईलसह जाण्यास मनाई
दिग्रस : जिल्ह्यात येत्या १६ व २१ फेब्रुवारीला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदाराला आपला उमेदवार निवडताना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्राबाहेर निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांचा लेखाजोखा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सवर उमेदवारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. यात उमेदवाराचे नाव, वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, जवळ असलेली संपत्ती, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास त्याची नोंद, दाखल गुन्हे या माहितीचा गोषवारा फ्लेक्सवर प्रदर्शित केला जाईल. मतदान करणाऱ्या मतदाराला आपण कुणाला मतदान करावे, यांचा निर्णय घेणे सोपे जावे तसेच निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार व त्यांची पार्श्वभूमी सार्वजनिक करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने हे पाउल उचलले आहे. याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. निवडणूक आयोगाने हा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे हे इथे उल्लेखनीय.
दिग्रस येथे निवडणूक कार्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जावून निवडणूक कार्याचा आढावा ते स्वत: घेत आहेत. आढावा सभेला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार शिवाजी बचाटे, गटविकास अधिकारी अमित राठोड, मुख्याधिकारी शेषराव टाले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राठोड, सर्व नायब तहसीलदार, सर्व झोनल अधिकारी व सर्व पथक प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Accounting of candidates will be seen outside the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.