वडगाव रोड ठाण्यात आरोपींचा राडा

By admin | Published: May 30, 2016 12:02 AM2016-05-30T00:02:56+5:302016-05-30T00:02:56+5:30

कौटुंबिक अत्याचारातून दोन परिवारात झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. परस्परांविरुद्ध अत्याचार आणि घरात येऊन

The accused are accused in the Vadgaon Road police station | वडगाव रोड ठाण्यात आरोपींचा राडा

वडगाव रोड ठाण्यात आरोपींचा राडा

Next

दोघांना अटक : अत्याचार आणि लुटमारीची परस्परविरुद्ध तक्रार
यवतमाळ : कौटुंबिक अत्याचारातून दोन परिवारात झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. परस्परांविरुद्ध अत्याचार आणि घरात येऊन लुटमार केल्याची तक्रार दाखल झाली. या वेळी ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी वडगाव रोड पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली. यानंतर ठाण्याच्या परिसरात लुटमारीच्या घटनेतील काही आरोपी उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना अटक करताना आरोपींनी पोलिसांसोबत झटापट केली. त्यामुळे संपूर्ण रात्रभर वडगाव रोड ठाणे परिसरात गोंधळाची स्थिती होती.
लुटमारीच्या घटनेतील आरोपी शेख वसीम शेख मुस्ताक (२५) रा. इसलामपुरा, शेख शहबाज शे. मुस्ताक (२२) रा. फुकटनगर यांना वडगाव रोडचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर आणि जमादार सुनील डोंगरे अटक करताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत चांगलीच झटापट केली. यात आरोपी वसीम याने स्वत:जवळ असलेली लोखंडी हुक डोक्यावर मारुन घेतल्याची माहिती आहे. त्यानंतरही पोलिसांनी दोघांंना ताब्यात घेतले.
आंबेडकरनगर परिसरातील १८ वर्षीय विवाहितेने आपल्यावरील अत्याचाराची तक्रार वडगाव रोड ठाण्यात सायंकाळी दिली. यावरून शेख सलीम शेख मेहबूब (४१) रा. असमाननगर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. यानंतर शेख सलीम शेख मेहबूब यांनी सदर विवाहितेच्या भावांविरोधात तीन लाख ३६ हजार रुपये जबरी चोरल्याची आणि चार लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दिली. यामध्ये शेख अल्ताफ, शेख शहबाज, शेख वसीम आणि सज्जू नामक युवकासह इतर पाच ते सहा जणांविरोधात तक्रार दिली. या आरोपींनी शेख सलीम यांच्या घरात शिरुन लोखंडी पाईपने दोन दुचाकी, दोन कार, टीव्ही, घड्याळ फोडून चार लाखांच्या नुकसानची तक्रार दिली.
या दोनही घटनांची तक्रार नोंदविण्यासाठी वडगाव रोड पोलीस ठाण्यात मोठा जमाव आला होता. पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेतल्या. मात्र तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसताच रात्री ११.३० वाजता गर्दी पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास अंमलदार आनंद पिदूरकर यांनी अटकेची कारवाई केली. यावेळी आरोपींनी पोलिसांशी झटापट करून अटक चुकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोपींविरोधात पिदूरकर यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The accused are accused in the Vadgaon Road police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.