अपघात झाल्याने खुनातील आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:35+5:302021-09-02T05:31:35+5:30

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका ३२वर्षीय तरुणाचा खून करून मारेगावमार्गे पळून जात असताना मारेकऱ्यांच्या वाहनाला मारेगाव येथे ...

Accused of murder caught in police trap due to accident | अपघात झाल्याने खुनातील आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

अपघात झाल्याने खुनातील आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Next

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका ३२वर्षीय तरुणाचा खून करून मारेगावमार्गे पळून जात असताना मारेकऱ्यांच्या वाहनाला मारेगाव येथे अपघात झाला. त्यामुळे खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही घटना मंगळवारी घडली.

बल्लारपूर येथील मिलिंद बोंदाळे (३२), सलमान मजिद खान पठाण (२४) व गणेश नरेश जंगम्मवार (२०, सर्व रा.दादाभाई नौरोजी वाॅर्ड, बल्लारपूर) यांच्यात वाद झाला. या वादात सलमान व गणेशने मिलिंदच्या डोक्यावर वार केला. मध्यस्थीसाठी गेलेला संघपाल कांबळे (रा, गणपती वाॅर्ड, बल्लारपूर) हादेखील गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी भरती केले असता, मिलिंंद बोंदाळे याचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल होताच, दोन्ही आरोपी चारचाकी वाहनाने मारेगावमार्गे पळून जात असताना त्यांच्या गाडीचा मांगरूळजवळ मंगळवारी सकाळी अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी अपघात वाहनातील तरुणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्राथमिक उपचारानंतर हे तिघेही रुग्णालयातून पळून गेले.

याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. तसेच या जखमी तरुणांना घेण्यासाठी बल्लारपूर येथून एक स्काॅर्पिओ मारेगावकडे निघाल्याची टीपदेखील पोलिसांना मिळाली. बल्लारपूर पोलिसांनी लगेच यासंदर्भात मारेगाव पोलिसांना कळविले. मात्र आरोपी रुग्णालयातून पळून गेल्याने ते मारेगाव पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र त्यांना घेण्यासाठी निघालेली स्काॅर्पिओ मारेगाव पोलिसांनी पकडली. त्यातील तरुणांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर बल्लारपूर पोलिसांचा ताफादेखील मारेगाव येथे पोहोचला. त्यानंतर स्काॅर्पियोमधून ताब्यात घेतलेल्या तरुणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून करंजी येथून गणेश जंगम्मवार याला तर कारंजा (जि.अकोला) येथून सलमान मजिद खान पठाण व चालक विष्णू (२१) याला ताब्यात घेतले.

Web Title: Accused of murder caught in police trap due to accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.