पुसदमध्ये दोन गटांत हाणामारी
By admin | Published: July 17, 2016 12:38 AM2016-07-17T00:38:37+5:302016-07-17T00:38:37+5:30
पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता येथील शिवाजी वार्डात घडली.
पुसद : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता येथील शिवाजी वार्डात घडली. यावेळी चाकूहल्ल्यात एक तरुण जखमी झाला. दोनही गटातील २१ जणांवर गुन्हा नोंदविला.
शिवाजी वार्डातील बेबीबाई अशोक थोरात (५०) ही मुलगा मनीष याला घेऊन रुग्णालयात जात होती. मार्गात शेख मुस्तकीन याने मनीषवर चाकूहल्ला केला. बेबीबाईने मदतीसाठी धावा केला. मदतीसाठी आलेल्यांवरही लाठीकाठीने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार गजानन शेळके, सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण आदी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
बेबीबाई थोरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन नाजीयाबी शेख अख्तर, आशियाबी शेख रऊफ, शेख अख्तर शेख मुस्तफा, सै.मन्सूर सै. हुसेन, शेख शाहरुख शेख रऊफ, शेख चाँद, शेख शब्बीर, शेख शकीर, शेख नदीम शेख अख्तर, शेख रफीक परवीनबी, शेख सलमान, शेख मुस्तकीन यांच्यावर गुन्हा नोंदविला. दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून बेबी थोरात, अशोक थोरात, मंदा थोरात, शिवाजी थोरात, जगन थोरात, मनीष थोरात, राजू थोरात, माजी नगरसेवक मंगळे या आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. शेख अख्तर शेख मुस्तफा, सै.मन्सूर सै. हुसेन, शेख शाहरुख शेख रऊफ यांना अटक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (प्रतिनिधी)