पुसद येथे आदिवासी एकता महोत्सव

By admin | Published: August 11, 2016 01:14 AM2016-08-11T01:14:29+5:302016-08-11T01:14:29+5:30

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदिवासी एकता महोत्सव आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात मंगळवारी करण्यात आले होते.

Adivasi Ekta Mahotsav at Pusad | पुसद येथे आदिवासी एकता महोत्सव

पुसद येथे आदिवासी एकता महोत्सव

Next

प्रबोधन कार्यक्रम : जागतिक आदिवासी दिन उत्साहात, ढेमसा नृत्याने लक्ष वेधले
पुसद : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदिवासी एकता महोत्सव आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात मंगळवारी करण्यात आले होते. उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंतराव पुरके, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.माधव सरकुंडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश इंगळे, परशराम डवरे, पुसद पंचायत समितीच्या माजी सभापती आशा पांडे, पंचायत समिती सदस्य प्रेम मेंढे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गणेश इनवाते, डॉ.हरिभाऊ फुपाटे, आदिवासी समाजसेवक श्याम व्यवहारे, रामकृष्ण चौधरी, श्रीराम कऱ्हाळे आदी उपस्थित होते.
पुसदमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन आदिवासी कर्मचारी संघटना, बिरसा मुंडा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी संघटनांसह अखिल आदिवासी चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात आदिवासी युवकांनी ढेमसा नृत्य सादर केले. यावेळी बोलताना मनोहरराव नाईक म्हणाले, आदिवासींना दिशा देण्यासाठी क्रांतिकारी बिरसा मुंडांची जयंती व जागतिक आदिवासी दिनाला शासकीय सुटी घोषित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शिवाजीराव मोघे म्हणाले, शिक्षणाचा अभाव व आर्थिक दुर्बलता हेच आदिवासीच्या विकासाचे अडसर आहे. सिलिंगचा कायदा, मूळ कायदा करून काँग्रेसने आदिवासी हिताचे कायदे केल्याचे त्यांनी सांगितले.
वसंतराव पुरके म्हणाले, समाजाला चांगले नेतृत्व मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे अध्यक्ष सुरेश धनवे यांनी केले. संचालन आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भास्कर मुकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला आदिवासी कर्मचारी संघटनेचे किसन भुरके, सुभाष गंधारे, लक्ष्मण नांदे, पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, नाना बेले, अ‍ॅड.रामदास भडंगे, किरण आत्राम, रमेश उमाटे, रामकृष्ण चौधरी, देवीदास डाखोरे, बालाजी उघडे, संदीप कोठुळे, सुरज गेडाम, दीपक खोपसे, गीता बळी, उज्ज्वल तडसे, सुरज बोडखे, फकिरा जुमनाके, शेषराव पांडे, आनंदराव भरकाडे, ज्ञानेश्वर तडसे, मारोतराव वंजारे, विजय मळघने, संजय डुकरे, नत्थू आढाव, किसनराव कुरकुटे, ग्यानबा काळे, आप्पाराव घुक्से उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Adivasi Ekta Mahotsav at Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.