पालिकेत प्रशासन वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:00 PM2017-12-05T22:00:40+5:302017-12-05T22:01:08+5:30

येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही.

Administration in the municipality | पालिकेत प्रशासन वरचढ

पालिकेत प्रशासन वरचढ

Next
ठळक मुद्देलोकशाही दिनात तक्रार : सत्ताधारी सदस्य, पदाधिकारी अगतिक

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही. पदाधिकारी, सदस्यांवर प्रशासनच वरचढ ठरल्याचे दिसून येते. अनेकांनी तर आता नगरपरिषदेत येणेच सोडून दिले. मंत्री, आमदार असूनही प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकत नसल्याने पालिका पदाधिकाºयांना चक्क लोकशाही दिनात तक्रारी कराव्या लागत आहेत.
यापूर्वी नगरपरिषद प्रशासनावर पदाधिकाºयांची पूर्णत: पकड होती. त्याकाळात शहराचा सर्वच बाबतीत राज्य पातळीवर लौकिक होता. शहरातील विकास कामांसाठी व दैनंदिन उपाययोजनांकरिता नगरसेवक एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकत होते. पालिकेत पक्षीय भेदाभेद अपवादानेच पहावयास मिळत होता. मात्र दुर्दैवाने सध्या नगरपरिषदेत प्रत्येक जण पक्षाचा मुखवटा घेऊन वावरत असल्याने प्रशासनाला वेळ मारून नेण्याची आयतीच संधी चालून आली. परिणामी सत्तेत असूनही पदाधिकारी व नगरसेवक अगदी छोट्याछोट्या बाबींसाठी अगतिक झाले आहेत.
राणाप्रतापनगरमध्ये एका बिल्डरने खुल्या जागेत अतिक्रमण केले. त्याची तक्रार खुद्द एका सभापतींनी केली. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पालिका प्रशासनापुढे सादर केली. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. वारंवार विचारणा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी सभापतींना लोकशाही दिनात तक्रार करावी लागली. अनेक प्रकरणांमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा असाच अनुभव आहे.
पालिकेत नगराध्यक्ष हे घटनात्मक पद शिवसेनेकडे, तर सभागृहात ठराव मंजूर करण्यासाठी लागणारे बहुमत भाजपाकडे आहे. उपाध्यक्ष ते विषय समिती सभापतीसुद्धा भाजपाचेच आहेत. त्यानंतरही येथील प्रशासन जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचा लाभ प्रशासन घेत असून एकाही निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होत नाही. यातच वाढीव क्षेत्रातील नगरसेवक तर अद्याप प्रशासनाचा अभ्यासच करीत आहेत. प्रशासन प्रमुख आणि पदाधिकाºयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. अनेकदा तर वैयक्तीक पातळीवर आगपाखड केली जाते. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
प्रशासन तासिकेवर, ज्येष्ठ गप्पच
नगरपरिषद प्रशासनाचा कारभार घड्याळी तासिकेप्रमाणे सुरू असून कार्यालयीन वेळ संपताच काम थांबते. एक दोन विभाग प्रमुख प्रामाणिकपणे काम करण्यासाठी झटतात. मात्र त्यांना ज्येष्ठांकडून साथ मिळत नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभा असो वा इतरवेळी नगरसेवक व पदाधिकाºयांचा रोष सहन करणे एवढीच भूमिका या कर्तव्यतत्पर विभाग प्रमुखांची उरली आहे. जुन्या ज्येष्ठांनी गप्प बसून जे जे होते ते ते पहावे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागात बोंबाबोंग सुरू आहे. पदे रिक्त असल्याचे कारण पुढे करून प्रशासन प्रमुख जबाबदारी झटकत आहे. यामुळे सत्ताधाºयांची एकप्रकारे कोंडी झाली. पक्षाचेच कंत्राटदार काम करीत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत बोलण्याचीही सोय नाही.

Web Title: Administration in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.