‘मेडिकल’च्या प्रशासकीय इमारतीचा तिढा कायम
By admin | Published: February 28, 2015 01:59 AM2015-02-28T01:59:23+5:302015-02-28T01:59:23+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९९० च्या दशकात प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन करण्यात आले होते.
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९९० च्या दशकात प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन करण्यात आले होते. तीन मजली या इमारतीचा केवळ तळ मजलाच पूर्णत्वास आला आहे. अनेक वर्षापासून हक्काच्या कार्यालयात जाण्यास अधीर झालेल्या कर्मचाऱ्यांनी निर्माणाधिन इमारतीत स्थलांतर केले आहे. तर काहींनी काम पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही, अशी भुमिका घेतली आहे.
मेडिकल मध्ये प्रशासकीय इमारत नसल्याची त्रृट सातत्याने एमसीआय भारतीय वैद्यकीय परिषदेकडून घेण्यात येत होती. प्रत्येक वर्षी वेळ मारून न्यावी लागत होती. इतकेच काय तर अभ्यागत कक्ष नसल्याची बाब सुध्दा एमसीआयच्या चुमने सातत्याने अधोरेखीत केली आहे. ही समस्या केवळ महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम रखडल्यामुळे निर्माण झाली. अतिशय चुकीच्या पध्दतीने प्रसुती विभाग हा दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आला. यामुळे महिलांना अनेक अडचणी सहन कराव्या लागातात. अधिष्ठाता कार्यालय, रुग्णालयाचे आणि महाविद्यालयाचे प्रशासकीय कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात वॉर्डमध्ये थाटण्यात आले होते. मात्र प्रशासकीय इमारतीच्या कामाला तब्बल २५ वर्ष लागले. या कालावधीत केवळ तळमजला तयार झाला. तो सुध्दा अजुनही अपुर्णावस्थेतच आहे. येथील लेक्चर हॉल तयार व्हायाचे आहे. या इमारतीमध्ये अधिष्ठाता कार्यालय, प्रशासकीय कार्यालयासोबतच सुक्ष्मजीवशास्त्र, फिजीओलॉजी विभाग, विकृतीशास्त्र येथे हलविण्यात येणार आहे.
मार्च पूर्वी इमारतीचा ताबा घेण्याची धडपड माहाविद्यालय प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी तातडीने कार्यालय स्थलांतरीत केले आहे. प्रत्यक्षात इमारतीमध्ये अनेक कामे अपुर्णच आहेत. नळ फिटींग, पाण्याची व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वार, यासह अनेक कामे व्हायची आहेत. मात्र मार्च एडींगपूर्वी इमारतीचा ताबा घेण्यासाठी काहींकडून अगाऊ ‘इंटरेस्ट’ दाखविण्यात येत आहे. इमारतीच्या निर्मितीचा तिढा हा भुमिपूजनापासूनच कायम आहे. आता ताबा घेण्याची प्रक्रियाही सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पूर्ण सोयी सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय कार्यालय हलविणार नाही, अशी भुमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नवीन कार्यालयात जाण्यावरूनच सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)