पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By विशाल सोनटक्के | Published: February 27, 2024 07:07 PM2024-02-27T19:07:00+5:302024-02-27T19:07:20+5:30

 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा 

Administrative system ready for Prime Ministers visit | पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवार २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ नजीक भारी येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला.  

व्यासपीठासह बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची महाजन यांनी स्वत: पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील विभाग प्रमुखांशी संवाद साधला. कार्यक्रम स्थळावरील शिल्लक कामे आज मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याबरोबरच मंडपात उभारलेल्या कक्षामध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये खाद्य पदार्थांसह पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार असून प्रत्येक बससोबत एका समन्वयकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यातून परिवहन महामंडळाच्या  १ हजार ९२५ बसमधून महिला या मेळाव्यासाठी येणार आहेत. या महिलांना कार्यक्रमस्थळी सुरक्षित आणण्याबरोबरच परतीच्या प्रवासाबाबतही दक्षता घेण्याचे निर्देश गिरीष महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी आमदार मदन येरावार, आमदार डाॅ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डाॅ. निधी पांडे, जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. पवन बनसोड आदी उपस्थित होते.

Web Title: Administrative system ready for Prime Ministers visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.