अखेर ‘ईओं‘नी केला पत्रात बदल

By admin | Published: May 22, 2016 02:19 AM2016-05-22T02:19:04+5:302016-05-22T02:19:04+5:30

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दुय्यम सेवापुस्तके वाटप कार्यक्रमासाठी काढलेल्या पत्रातील ‘दम’ अखेर मागे घेतला.

After all, the change in the letter of 'eo' | अखेर ‘ईओं‘नी केला पत्रात बदल

अखेर ‘ईओं‘नी केला पत्रात बदल

Next

वणी : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दुय्यम सेवापुस्तके वाटप कार्यक्रमासाठी काढलेल्या पत्रातील ‘दम’ अखेर मागे घेतला. आता कर्मचाऱ्यांची दुय्यम सेवापुस्तके कार्यक्रमानंतर कोणत्याही दिवशी मुख्याध्यापक व शाळेच्या प्रतिनिधींना दिले जातील, असा पवित्रा घेतला.
दुय्यम सेवापुस्तकांचे वितरण पालकमंत्री, राज्यमंत्री, शिक्षक आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्याहस्ते करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी २२ मे रोजी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी आवर्जून उपस्थित राहावे म्हणून त्यांनी १७ मे रोजी मुख्याध्यापकांच्या नावे पत्र काढून ते सोशल मीडियावर टाकले. त्यात ज्यांची सेवापुस्तक त्यांनाच मिळेल. २२ तारखेनंतर कोणालाही सेवापुस्तक मिळणार नाही व त्यानंतर हे कार्यालय कुणाचीही तक्रार ऐकून घेणार नाही, असा दम देण्यात आला होता. ही बाब ‘लोकमत’ने बातीमद्वारे शिक्षकांसमोर मांडली. त्यावरून जिल्हा मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक संघ यांनी १७ मेच्या पत्रावर आक्षेप घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. हुकूमशाही पद्धतीने आदेश काढो जात असेल, तर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी झालेली चूक मान्य करून पत्रात सुधारणा केली. आता सेवापुस्तक कार्यक्रमानंतरही शाळांच्या प्रतिनिधींकडे दिली जातील, हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे मुख्याध्यापक संघाने बहिष्कार मागे घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार
दुय्यम सेवापुस्तक वाटपाच्या कार्यक्रमावरून शिक्षणाधिकारी व शिक्षण आमदारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेऊन शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष पी.के.टोंगे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे. ते स्वत: यवतमाळ जिल्ह्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव असताना त्यांनी दुय्यम सेवापुस्तक व सेवाज्येष्ठता यादीचा प्रश्न आमदार बी.टी.देशमुख व पु.ब.सोमवंशी यांच्याद्वारे विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी शासकीय कार्यक्रम घ्यावा लागत असल्याबाबतची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: After all, the change in the letter of 'eo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.