कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:21+5:30

झिका व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. केरळमध्ये त्याचे काही रुग्ण दृष्टीस पडले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने अति तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. गावापासून ते शहरापर्यंत सर्वांना झिका व्हायरस पसरू नये म्हणून डासांच्या उत्पत्ती केंद्रावर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. 

After the corona, now the threat of Zika virus | कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

googlenewsNext
ठळक मुद्देइटलीमधून प्रवेश : आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : झिका व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. केरळमध्ये त्याचे काही रुग्ण दृष्टीस पडले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने अति तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. गावापासून ते शहरापर्यंत सर्वांना झिका व्हायरस पसरू नये म्हणून डासांच्या उत्पत्ती केंद्रावर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. 
उपाययोजना काय ?
डासांची उत्पत्ती करणारे केंद्रे नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. शाैच्छालयाचे पाईप जाळीदार पिशवीने बांधून ठेवल्यास मच्छरे बाहेर पडणार आहे. याशिवाय गप्पी मासे डबक्याच्या ठिकाणी सोडल्यास मच्छरे नष्ट होते.

कशामुळे होतो?
एडीस नावाच्या डासापासून झिका व्हायरस पसरतो. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. दिवसा चावतो. विशेष म्हणजे कमरेच्या खाली हा मच्छर चावण्याचे प्रमाण जास्त आहे. 

झिका व्हायरसची लक्षणे काय? 
- अंग दुखणे, सांधे दुखणे, ताप येणे, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे.
- या व्हायरसवर कुठलीही लस नाही. कुठलाही उपचार नाही.
- गर्भवती महिलेला हा डास चावल्यास जन्मास येणाऱ्या शिशुच्या मेंदूचा आकार छोटा होतो. यामुळे अधिक खबरदारी बाळगली जात आहे. 

सर्वांनी एकत्रितपणे अंमल करावा
झिका व्हायरस रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. फाॅगिंग मशीन आणि काही औषधी मोकळ्या जागेंवर फवारली जाणार आहे. याशिवाय गप्पी मासेही सोडले जाणार आहे. 
    - डाॅ.विजय आकोलकर, जिल्हा हिवताप अधिकारी

 

Web Title: After the corona, now the threat of Zika virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.