कोरोनानंतर जिल्ह्यात भरणार विनादप्तराची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:02+5:30

कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांचा कोरोनापासून बचाव कसा करता येईल, याबाबत शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे, डॉ. सतपाल सोवळे यांनी सविस्तर आराखडा सभेत मांडला.

After Corona, there will be a Vinadaptara school in the district | कोरोनानंतर जिल्ह्यात भरणार विनादप्तराची शाळा

कोरोनानंतर जिल्ह्यात भरणार विनादप्तराची शाळा

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण समितीची सभा, विद्यार्थ्यांना दप्तर देण्यासाठी २० लाखांची तरतूद, २० लाख प्रोजेक्टरसाठी

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनानंतर शाळा सुरू होतील, तेव्हा होतील.. मात्र शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य न घेता शाळेत येता यावे, यासाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करून दिले जाणार आहे.
यंदाच्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेने शिक्षणासाठी दीड कोटींची तरतूद केलेली आहे. त्यातूनच आता २० लाख रुपये दप्तर खरेदीसाठी आणि २० लाख रुपये शाळेतील प्रोजेक्टर खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या सभेत या विषयावर सांगोपांग चर्चा झाली.
कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांचा कोरोनापासून बचाव कसा करता येईल, याबाबत शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे, डॉ. सतपाल सोवळे यांनी सविस्तर आराखडा सभेत मांडला.
तर शिक्षक संघटनांच्या महासंघानेही सीईओंना निवेदन देऊन याबाबत विविध सूचना केल्या. त्यानुसार, शिक्षण समितीने दप्तर व प्रोजेक्टरचा विषय मार्गी लावला आहे.
या तरतुदीनुसार, आता जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून कोणतेही साहित्य आणण्याची गरज राहणार नाही. दप्तर, वह्या, पेन हे साहित्य सेस फंडातून दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तके समग्र शिक्षा अभियानातून मिळाणार आहे. या शिवाय, मागील वर्षीच्या पुस्तकांचा एक संचही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे एक पुस्तक घरी तर एक पुस्तक शाळेत राहील. त्यामुळे दप्तर किंवा पुस्तके घेऊन येण्याचीही गरज राहणार नाही, अशी माहिती मधुकर काठोळे यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा आदेश आल्यास शिक्षक पूर्णपणे तयार असल्याची ग्वाही शिक्षण समितीच्या सभेत देण्यात आली. मात्र तत्पूर्वी गावखेड्यातील परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.

कोरोनाचे ‘ते’ दोन कोटी शाळेतच वापरा !
यवतमाळ शहरातील कोरोनाच्या स्थितीत सील केलेल्या परिसरात तातडीने मदत पुरविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय झाला होता. मात्र मार्चऐवजी एप्रिलमध्ये ही कपात करण्यात आली. तोपर्यंत सील परिसरातील रुग्णसंख्या कमी होऊन त्या परिसरातील निर्बंधही हटविण्यात आले. त्यामुळे कपात झालेली दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम तशीच पडून आहे. आता ही रक्कम शाळांवर खर्च करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या महासंघाने सीईओंकडे केली. या रकमेतून शाळेला विद्यार्थीसंख्येएवढे मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, स्वच्छतागृह, वीजबिल आदींचा खर्च करण्याची मागणी आहे. मात्र या निधीचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे.

आश्रमशाळा शिक्षकांना हजेरीचा आदेश
शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना २६ जूनपासून शाळेत हजर राहण्याचे आदेश धडकले आहे. मात्र शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला नाही. शिवाय जिल्ह्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: After Corona, there will be a Vinadaptara school in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.