सर्जिकल स्ट्राईकनंतर सामान्यांचे पाकिस्तानवर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:36 PM2019-02-26T21:36:44+5:302019-02-26T21:37:06+5:30

‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते.

After surgical strikes, the rest of the literature on Pakistan | सर्जिकल स्ट्राईकनंतर सामान्यांचे पाकिस्तानवर शरसंधान

सर्जिकल स्ट्राईकनंतर सामान्यांचे पाकिस्तानवर शरसंधान

Next
ठळक मुद्देयवतमाळकरांचा आवाज गरजला : ‘भारत माता की जय’, सबूत देऊनई मानत नाई... आता घे म्हणा शेक्कून

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते. तरी पाकिस्तान मने का कसाबले आमी धाडलंच नाई. आता सबूत गिबूत नाई बाबू. डायरेक बदलाच. घे शेक्कून!’ हे शब्द आहेत रस्त्यावर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या सर्वसामान्य यवतमाळकर माणसाचे अन् पाकिस्तानवर खवळलेल्या सर्वसामान्य भारतीयाचे.
मंगळवारी पहाटेच्या वेळेस भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मिरात ४४ भारतीय जवानांच्या पाठीवर वार केला होता. त्या भेकड हल्ल्याने भारतीय जनमानस अस्वस्थ होते. पण मंगळवारी भारतीय जवानांनी ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडून ‘सूतसमेत’ वसुली केली. या सर्जिकल स्ट्राईकची खबर कळताच यवतमाळात भारतीय जवानांबद्दलचा अभिमान दाटून आला. रस्त्यावर राबणारे, हातगाडी चालविणारे, शेतात घाम गाळणारे असे सारेच आनंदून गेले. महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये तर पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दणाणले आणि ‘भारत माता की जय’ असा गगनभेदी जयजयकार झाला.
गोली के बदले गोली, हेच बरोबर
दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या कारवाईबाबत मुख्य बाजारपेठेत चहाटपरी चालविणारा व्यावसायिक म्हणाला, ‘त्यायले तं पह्यलेच उडवाले पाह्यजे होतं साल्यायले. कवाचे तरास देऊन राह्यले आपल्या भारताले.’ दाते महाविद्यालयाच्या परिसरात जमलेले बिकॉमचे विद्यार्थी म्हणाले, ‘एका गालावर मारलं तं दुसरा गाल पुढे करायचा, हे आता जमत नाही. महात्मा गांधीजींचा काळ वेगळा होता. आता प्रेमानं चर्चा करतो म्हटलं तर पाकिस्तान ऐकतच नाही. गोली के बदले गोली, हेच बरोबर झालं.’ तर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुण म्हणाले, ‘पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, हे आता सिद्ध झाले आहे. तेथील दहशतवाद्यांनी आपल्या जवानांना मारले, ते साऱ्या जगाने पाहिले, तरी पाकिस्तानची मग्रूरी संपत नाही. आज भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर बॉम्ब टाकले ते बरेच झाले. पाकिस्तानच्या मनातही धाक निर्माण झाला पाहिजे, की भारत काहीही करू शकतो.’
पाक जनतेचाही दहशतवाद्यांना सपोर्ट
बसस्थानक परिसरातील व्यावसायिक म्हणाले, पाकिस्तानच्या जनतेचीही यात चूक आहे. तेथील लोक दहशतवाद्यांना सपोर्ट करतात. इतर देशांमध्ये आर्मीला खूप प्राधान्य दिले जाते. आपल्या देशातही तसे व्हायला पाहिजे. तर एक आॅटोचालक म्हणाला, ‘मी तं काई टीव्ही पाह्यली नाई. पण पाकिस्तानले झोडपलं आसन तं बरंच झालं.’
...तरीही संयम कायम
सर्वसामान्य भारतीयांनी सर्जिकल स्ट्राईकवर आनंद व्यक्त केला. मात्र हा आनंद व्यक्त करतानाही संयम राखणाºया प्रतिक्रिया उमटल्या. गोधनी रोडवर उसाचा रस विकणारा व्यावसायिक म्हणाला, ‘आपली दुश्मनी आतंकवाद्यांसोबत हाये. पाकिस्तानच्या जनतेनं आपलं काही घोडं मारलं नाई. तिथं आपलेच भाऊ बहीण हाये. हमले करणाºयायचा जो काही वाद हाये थो निपटवला पाहिजे अन् दोन्ही देशातले लोक सेफ राहिले पाहिजे.’ असाच काहीसा संयमी सूर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुणींनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘आपले सैन्य कोणत्याही कार्यवाहीसाठी सक्षम आहे. पण आजवर आपण चर्चेनेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुटत नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली. काहीही असो, युद्ध मात्र दोन्ही देशांना परवडणारे नाही.’
तरुणी म्हणाल्या, अ‍ॅक्शन आवश्यकच
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जसे सारे तरुण खूश झाले, तशा महिला आणि तरुणींमध्येही आनंदाची लाट आली. तरुणी म्हणाल्या, ‘पाकिस्तानविरुद्ध अशा अ‍ॅक्शन घेतल्याच पाहिजे. तेथील टेरर कॅम्पवर भारताने बॉम्ब टाकून धाक निर्माण केला आहे. पण आता आपल्या सरकारने असा काही निर्णय घेतला पाहिजे, पाकिस्तानची समस्या कायमचीच संपली पाहिजे. नाहीतर पुन्हा एखाद दुसरा आतंकवादी भारतात येत राहील आणि लपून छपून हल्ले करत राहील.’

Web Title: After surgical strikes, the rest of the literature on Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.