आजंतीत लग्नानंतर ‘शतकी’ वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:04 AM2017-07-21T02:04:49+5:302017-07-21T02:04:49+5:30

पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र तालुक्यातील आजंती या खेड्यात नव वरवधूने चक्क आपल्या ....

After the wedding in honor, 'century' tree will be planted | आजंतीत लग्नानंतर ‘शतकी’ वृक्षलागवड

आजंतीत लग्नानंतर ‘शतकी’ वृक्षलागवड

Next

नवदाम्पत्याचा पुढाकार : गावात ठिकठिकाणी लावली १०० झाडे
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र तालुक्यातील आजंती या खेड्यात नव वरवधूने चक्क आपल्या लग्नात १०० वृक्षांची लागवड करून मगच गृहप्रवेश केला. वैयक्तिक समारंभाला त्यांनी दिलेला सामाजिक स्पर्श चर्चेचा विषय ठरला आहे.
वृक्ष लावा, सृष्टी जगवा, अशी हाक देत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. त्याच वेळी चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका शिला गोपाळसिंह चौहाण यांनी त्यांचे पुतणे संग्रामसिंह प्रेमसिंह चौहाण यांच्या विवाहनिमित्तही वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम राबविला. हा विवाह नेर तालुक्यातील आजंती येथे नुकताच पार पडला.
विवाहानंतर नवदाम्पत्य संग्रामसिंह व पूजा यांच्या हस्ते गृहप्रवेशापूर्वी वृक्षलागवड करण्यात आली. आजंती येथील अनेक प्रशस्त व मोक्याच्या ठिकाणी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत १०० झाडे लावण्यात आली. नगरसेविका चौहाण यांनी गावभर कॉर्नर सभा घेऊन जनजागृती केली. वनविभागामार्फ वृक्ष उपलब्ध करून देत नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुंड, वनपाल शिरभाते, वनरक्षक राऊत, वनमजूर अशोक कदम, प्रेमसिंह ठाकूर, सरपंच सीमा राठोड, सचिव धुर्वे, तलाठी राऊत यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सुरेश पुनसे, विठ्ठलसिंह ठाकूर, सुनिल श्रृंगारे, श्याम चव्हाण, मंगेश अवघड, रेश्मा व साक्षी ठाकूर, आरती तोमर, अशोक पवार, गणेश राठोड, किसन पवार, गौरव साहील, गजेंद्रसिंह आदींनी योगदान दिले. वृक्षारोपणासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असताना अशा वृक्षारोपणाने त्याला प्रोत्साहन मिळत आहे.

Web Title: After the wedding in honor, 'century' tree will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.