पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Published: December 30, 2015 02:54 AM2015-12-30T02:54:07+5:302015-12-30T02:54:07+5:30

नगरपरिषदेने दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी प्रारंभ केला. आझाद मैदानातून मोहीम उघडण्यात आली.

Again the encroachment campaign | पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

Next

आझाद मैदानातून प्रारंभ : जिल्हा कचेरीचा विळखा काढला
यवतमाळ : नगरपरिषदेने दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी प्रारंभ केला. आझाद मैदानातून मोहीम उघडण्यात आली. रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविल्यानंतरच ही मोहीम संपणार आहे.
काही महिन्यांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदेने मुुख्य मार्गासह अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले होते. यानंतर ही मोहीम थांबली होती. दुसऱ्या टप्प्यात शहरातील रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येणार होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरपरिषदेने अहवाल सादर केला व अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलही अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले.
ही मोहीम अखंड सुरू राहणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. सकाळी ८ वाजतापासून ही मोहीम आझाद मैदानातून सुुरू करण्यात आली. आझाद मैदानाला अतिक्रमणाचा वेढा बसला होता. या ठिकाणची ५० अतिक्रमणे काढण्यात आली. ठेले बुल्डोझरच्या मदतीने उलथविण्यात आले, तर चिवडा विक्रेत्यांच्या मार्गावरील संपूर्ण रस्ता खुला करण्यात आला. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम जुन्या मार्केटमधील टांगा चौकात शिरली. या ठिकाणी असलेल्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यात आले, तर दुुकानाचे छत रस्त्यावर आलेल्या विक्रेत्यांना छत काढण्याच्या सूचना यावेळी नव्याने पथकाने दिल्या.
यामुळे या भागात पहाटेपासून लगबग पाहायाला मिळाली. हटविलेली दुकाने उचलून नेण्यासाठी मोठा ताफा होता. जे विक्रेते हजर नव्हते, त्यांचे ठेले नगरपरिषदेने अतिक्रमण ठिकाणावरून काढून नेले.
ही मोहीम पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुुप खांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांची चमू उपस्थित होती. कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा ताफा, वाहने आणि दुकाने हटविण्यासाठी बुल्डोझर सोबत होता. बुधवारी ही मोहीम शहरातील विविध भागात शिरणार आहे. बुल्डोझरच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्याची व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. अतिक्रमणे हटवून पार्किंगकरिता पट्टे आखले जाणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)

जनहित याचिका आणि आझाद मैदान
आझाद मैदानातील अतिक्रमणाबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. विकासकामाच्या नावाखाली या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला. त्यापूर्वी नगरपरिषदेने आझाद मैदानात कुठलेही कार्यक्रम घेणार नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. मात्र, यानंतरही कार्यक्रमाला जागा दिली गेली. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या ठिकाणचा निकाल लागायचा आहे. याबाबतचा न्यायालयातील दस्ताऐवज अ‍ॅड. जयसिंग चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दाखविला. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी वकिलाच्या सल्ल्यानंतर आझाद मैदानातील मोहीम होणार असल्यास स्पष्ट केले.

Web Title: Again the encroachment campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.