पुन्हा दोन शिक्षकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:27 PM2018-10-17T23:27:50+5:302018-10-17T23:28:46+5:30

बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात दरदिवशी नवनवीन प्रकरणे पुढे येत आहेत. दोन सेवानिवृत्त शिक्षकांचीसुद्धा संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे प्रकरणात लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे. या शिक्षकांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपबिती कथन केली.

Again two teachers cheated | पुन्हा दोन शिक्षकांची फसवणूक

पुन्हा दोन शिक्षकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देभूखंड घोटाळा : संदीप टॉकीजचे दुकान गाळे, ५० लाखांचे कर्ज असताना विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात दरदिवशी नवनवीन प्रकरणे पुढे येत आहेत. दोन सेवानिवृत्त शिक्षकांचीसुद्धा संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे प्रकरणात लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे. या शिक्षकांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपबिती कथन केली. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक व्हावी म्हणून त्यांनी हे दुकान गाळे खरेदी केले. मात्र राकेश यादवने त्यांची फसवणूक केल्याने त्यांची आयुष्याची पुंजी व्यर्थ गेली आहे.
मधुकर नामदेव जवळेकर रा. गांधी चौक यवतमाळ आणि बालाजीपंत रामचंद्र ढवळे रा. आदर्शनगर यवतमाळ अशी या शिक्षकांची नावे आहेत. म्युनिसिपल हायस्कूलमधून ते सेवानिवृत्त झाले आहे. सेवािनवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्या दोघांनीही संदीप टॉकीज परिसरातील पाच दुकान गाळ्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे दुकान गाळे ८ आॅक्टोबर २०१४ ला खरेदी केले. त्यावेळी या गाळ्यांवर कोणताही आर्थिक बोजा नसल्याचे निल सर्टिफिकेट राकेश यादवने त्यांना दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात या पाच दुकानांवर ५० लाख रुपयांचे कर्ज उचलले गेले होते. ज्या बँकेतून कर्ज उचलले गेले, त्या बँकेने १ एप्रिल २०१४ रोजी भूमिअभिलेख विभागाला रितसर अर्ज देऊन दुकान गाळ्यांच्या सातबारांवर बोझा चढविण्याची विनंती केली होती. मात्र राकेश यादवच्या संबंधामुळे भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १६ महिने विलंबाने अर्थात ३१ आॅगस्ट २०१५ ला हा बोझा चढविला. राकेशने २५ मार्च २०१४ ला या दुकान गाळ्यांवर बँकेतून ५० लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर सात महिन्यांनी हे दुकान गाळे कर्ज निल दाखवून विकले गेले. त्यात अनेकांची फसवणूक झाली. त्यावरून गुन्हेही नोंदविले गेले.
आता आणखी हे एक प्रकरण पुढे आले आहे. या सेवानिवृत्त शिक्षकांनी आता यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी ‘एसआयटी’च्या अधिकाºयांची भेट घेतली होती. तेव्हा तुम्ही दुकान ताब्यात घ्या, पाहिजे तर भाड्याने द्या, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी हे दुकान भाड्याने दिले. मात्र आता बँका ५० लाखांच्या कर्जापोटी ही दुकाने आपल्या ताब्यात घेण्यासाठी धडपड करीत आहे. भूखंड माफियांकडून फसवणूक झाल्याची अशी आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बँकांनो, प्रॉपर्टी ताब्यात घ्या - जिल्हाधिकारी
कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात बँकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. प्रॉपर्टी बँकांना तारण ठेऊन त्यावर कर्ज उचलले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात ज्याने प्रॉपर्टी तारण ठेवली तो मुळात त्या प्रॉपर्टीचा मालकच नाही. त्यामुळे बँकांची कोंडी झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी बँकांना त्यांच्याकडे कर्जापोटी तारण असलेल्या संबंधित प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले आहे. त्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणेची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले. या आदेशाची अंमलबजावणी बँकांनी सुरू केली आहे. सोमवारी ५० लाखांचे कर्ज देणाºया बँकेच्या अधिकाºयांनी संदीप टॉकीज परिसरातील सदर दोन सेवानिवृत्त शिक्षकांच्या दुकान गाळ्यावर धडक दिली. ही प्रॉपर्टी आम्ही पोलीस व महसूल यंत्रणेसोबत येऊन कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतो, असे बँक अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे सदर दुकान गाळे मालक हादरले आहे. बँकांकडे प्रॉपर्टी तारण असली तरी ती मुळात कर्जदाराच्या मालकीची नाही, त्याने तोतया मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून ही प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली. ती आता बँकां आपल्या कर्जापोटी जप्त करीत असल्याने मूळ मालकांचे काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. शासकीय यंत्रणेने कोणतीही खातरजमा न करता परस्पर प्रॉपर्टी विक्रीचा सौदा केला आणि बँकांनीसुद्धा फार खोलात न जाता लगेच कोट्यवधी रुपयांची कर्ज मंजूर केले, एकाच प्रॉपर्टीवर अनेक बँकांनी कर्ज दिले. शासकीय यंत्रणा व बँकांचा हलगर्जीपणा असताना मूळ भूखंड-दुकान गाळे मालकांना त्याचा फटका का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Again two teachers cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.