दिग्रस पालिकेवर पुन्हा सेनेचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:24 PM2018-01-12T22:24:47+5:302018-01-12T22:24:57+5:30

दिग्रस नगरपरिषदेच्या सभापती निवडीनंतर पालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काँग्रेसचा एक नगरसेवक शिवसेनेच्या गटात सामिल झाल्याने शिवसेनेला ४ सभापती पद मिळाले.

Against the regression of Digras Corporation | दिग्रस पालिकेवर पुन्हा सेनेचेच वर्चस्व

दिग्रस पालिकेवर पुन्हा सेनेचेच वर्चस्व

Next
ठळक मुद्देसभापतींची खांदेपालट : काँग्रेसचा एक नगरसेवक सेनेच्या गटात

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : दिग्रस नगरपरिषदेच्या सभापती निवडीनंतर पालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काँग्रेसचा एक नगरसेवक शिवसेनेच्या गटात सामिल झाल्याने शिवसेनेला ४ सभापती पद मिळाले. तर काँग्रेस आणि सत्तारुढ अपक्ष गटाला एका पदावर समाधान मानावे लागले. स्थायी समितीमध्ये शिवसेना १ तर २ अपक्षांना संधी मिळाली.
दिग्रस नगरपरिषदेच्या सभापतीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सकाळी ११ वाजता सर्वप्रथम उपाध्यक्षांंना सभापतीपद देण्यासंदर्भात बैठक बोलाविण्यात आली. यामध्ये अचानक काँग्रेसचे गटनेते किशोर साबू यांनी शिवसेनेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांचे समर्थन केले. तर उर्वरित काँग्रेसच्या ५ सदस्यांनी विरोध केला. परंतु १३ विरुद्ध १० मतांनी अजिंक्य मात्रे आरोग्य सभापती झाले. किशोर साबू यांनी समर्थन दिल्याने शिवसेनेचे १३ संख्याबळ झाले आणि त्यांचे ४ सभापती निवडून आले. यात आरोग्य अजिंक्य मात्रे, पाणी पुरवठा ज्योत्स्रा काळे, शिक्षण वैशाली दुधे, सामान्य प्रशासन वसंता मडावी यांचा समावेश आहे. शिवसेनेचे समर्थन केल्याने किशोर साबू यांना बांधकाम सभापती पद देण्यात आले. सत्तारुढ अपक्ष गटाच्या खुर्शिद बानो या शिवसेनेच्या रुपाली भोयर यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडून आल्या. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीचा शेवट झाला. स्थायी समितीमध्ये नूर मोहम्मद खान, जावेद पहेलवान, बाळू जाधव यांची वर्णी लागली तर निर्मला चांदेकर यांना महिला व बाल कल्याण उपसभापतीपद देण्यात आले. पीठासिन अधिकारी म्हणून जयंत देशपांडे व शेषराव टाले यांनी काम पाहिले.
काँग्रेसचे नगरसेवक साबू पक्षातून निलंबित
दिग्रस नगरपरिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक, गटनेते तथा शहराध्यक्ष किशोर साबू यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’ला दिली. साबू यांनी पक्षाचे निर्देश पाळले नाही, सेनेशी घरठाव करून स्वत: सभापतिपद मिळविले. लवकरच त्यांच्या नगरसेवकपदाला आव्हान दिले जाणार आहे.
गटनेता पत्नी, मात्र व्हिप बजावला पतीने !
जावेद पहेलवान यांनी ८ अपक्ष नगरसेवकांना व्हीप बजावला होता. त्यामध्ये शिवसेना समर्थित नूर मोहम्मद खान, मंगला जामकर यांना सुद्ध व्हीप बजावला होता. परंतु गटनेत्या सदफजहाँ मो. जावेद असताना व्हीप मात्र त्यांचे पती जावेद पहेलवान यांच्या सहीने देण्यात आला. तर सभागृहमध्ये सदफजहाँ यांनी तोंडी सूचना दिल्याचे सांगितले. परंतु पीठासिन अधिकाºयांनी आक्षेप फेटाळले.

Web Title: Against the regression of Digras Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.