यवतमाळ जिल्ह्यात घाटंजीमध्ये शेतकऱ्याचे शेतातील मातीत गाडून घेऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:14 PM2020-11-12T15:14:28+5:302020-11-12T15:14:53+5:30
नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतक-याने स्वत:ला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतक-याने स्वत:ला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे. मोरेश्वर वातीले असं या आंदोलनकर्त्या शेतक-याचं नाव आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जरुर येथे हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
सततचा पाऊस आणि बोगस बियाण्यामुळे खरिप हंगामातील कापुस व सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहेत.सोयाबीनच्या शेंगा ह्या भरल्या नसल्यामुळे उभ्या पीकात रोटावेटर आणि आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत . असे असतांना स्थानिक प्रशासनाकडून चुकीची आणेवारी काढल्या गेल्याने घाटंजी तालुका शासकीय मदतीपासून वगळला गेला.याच्या निषेधार्थ जरुर येथील शेतकरी मोरेश्वर वातीले यांनी आपल्या शेतातील मातीत स्वत:ला गाडून घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत,चुकीची आणेवारी काढणा-या संबधितांवर बडतफीर्ची कारवाई तसेच पीक विमा शतप्रतिशत शेतक-यांच्या खात्यात जमा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.