रात्रीच्या काळोखात कृषी सिंचन, शेतकऱ्यांच्या सिंचनाचे अजब वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 11:46 AM2020-11-27T11:46:07+5:302020-11-27T12:00:04+5:30
Yawatmal News agriculture यावर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र सिंचन करण्यासाठी लागणारी वीज रात्रीला दिली जाते. या अवस्थेतही शेतकरी रब्बीचे सिंचन करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र सिंचन करण्यासाठी लागणारी वीज रात्रीला दिली जाते. या अवस्थेतही शेतकरी रब्बीचे सिंचन करीत आहे. त्यातही कमी दाब, लाईन ट्रीप होने अशे अणेक प्रकार घडतात. वीजेचा शॉक लागुन काहींचा मृत्यू झाला. तर काहींना सर्पदंश आणि जंगली जनावरांच्या हल्यास समोर जावे लागले. यानंतरही शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या संवेदना जाणुन घेण्यासाठी तयार नाही.
वीजेचे वीतरण करतांना पहीले प्राधान्य उद्योगाला, नंतर घरगुती ग्राहक आणि सरते शेवटी शेतीला वीजेचा पुरवठा होतो. यातही तीन दिवस दिवसा, आणि तीन दिवस रात्रीला वीजेचा पुरवठा होतो. एक दिवस सुटी राहते. रात्रीला होणारा वीजेचा पुरवठा मध्यरात्रीस सुरू होतो. कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. यासाठी शेतकरी रात्र जागुन काढतात. त्यानंतरही त्यांचे ओलीत होत नाही. हा गंभीर प्रकार शेतीच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालणार आहे. यानंतरही शेतकरी संकटांचा सामना करीत सिंचनाचा प्रयत्न करीत आहेत.
कृषी फिडरवर १६ तासाचे भारनियमन
कृषी फिडर आणि गावठान असा वीेजेचा पुरवठा विभागण्यात आला आहे. गावठान म्हणजे गावाला मिळणारी वीज आणि शेतीला मिळणारी वीज अशी विभागनी आहे. यात कृषी फिडरवर १६ तासाचे भारनियमन आकरले आहे. रात्री ११ चा वीज पुरवठा करण्यात येतो. अशा काळोखात शेतकऱ्यांना सिंचन करायचे असते. यात शेतकऱ्यांना स्वताचा जीवही गमवावा लागतो. हा कृर प्रकार थांबण्याचे नावच घेत नाही. लोकप्रतिनीधीचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.
शेतकऱ्यांची कुनालाच काळजी नाही. प्रत्येकजन बेफाम वागत आहे. रात्रीच्या वीज पुरवठ्यात अनेकवेळा कमी दाबाचा पुरवठा होतो. त्यात मोटरपंप जळतात. रानडूक्कर, साप इतर प्राण्याचा हल्ला झाला तर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळालीच पाहीजे.
शरद पाटील,
वनवारला, पुसद
वीज पुरठा सूरळीत असतो. दर महिन्याला वीजेच्या वेळापत्रकात विभागा नुसार बदल केला जातो. यात काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्रीला वीज पुरवठा केला जातो. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार हा वीज पुरवठा होतो.
संजय आडे
उप विभागिय अधिकारी वीज वितरण कंपनी, पुसद विभाग
जमेच्या बाजू
१ . जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत. विहीरी तुडूंब भरल्या आहेत. यामुळे मोठया प्रमाणात सिंचन शक्य आहे.
२. सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्रही सिंचनाखाली येण्याची संख्या वाढत आहे. शिवाय अनुदानावर बियाणे मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत सिंचनाखाली क्षेत्र आणता येणार आहे.