सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:00 AM2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:11+5:30

टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.

Agricultural jam in the Sunna-Dhoki area | सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

Next
ठळक मुद्देउभ्या पिकांची सुरक्षा धोक्यात : वाघाची दहशत अद्यापही कायमच

नरेश मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील सुन्ना या गावातील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतातील बांधावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला करून त्याला ठार कले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. घटना होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतात जायला कुणीही धजावत नसून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.
दरवर्षी शेतातील पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे नुकसान होते. वन्यप्राणी शेतात केव्हा शिरेल व केव्हा हल्ला करेल, याचा नेमच राहिला नाही. आता तर चक्क पट्टेदार वाघ जंगलाच्या बाहेर निघून शेतात शिरत आहे. गुरूवारी सुन्ना येथील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतात धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला केला, हे दृष्य पाहून शेतात असलेले मजूर घाबरून गेले. हा थरार काहीजणांनी आपल्या मोबाईल कॅमेºयातही कैद केला.
पांढरकवडापासून ११ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सुन्ना या गावात या अभयारण्यामध्ये एक मुख्य प्रवेशद्वार आहे. याच परिसरातून अभयारण्यालगत प्रविण बोळकुंटवार यांचे शेत आहे. बुधवारी महिला मजूर त्यांच्या शेतात काम करीत असतानाच वाघाने हल्ला केल्यानंतर या महिला अतिशय भयभीत झाल्या आहेत. अद्यापही स्वत:च्या डोळ्याने पाहिलेला थरार त्या विसरल्या नाही.
तेव्हापासून त्या शेतातही गेल्या नसल्याची माहिती सुन्ना येथील ग्रामस्थांनी दिली. सुन्ना व परिसरातील शेतकरी अद्यापही वाघाच्या दहशतीतच असून शेतीची संपूर्ण कामे ठप्प पडली आहेत. काही शेतकऱ्यांचे तुरीचे पीक अद्यापही काढायचे असून वाघाच्या दहशतीमुळे कोणीही शेतात जायला तयार नाही. गहू-हरभरा या पिकाची रखवाली करणे, तर सोडाच परंतु शेताकडेच फिरकायला कोणी तयार नाही.

२६ फेब्रुवारीपासून तळ ठोकून होती वाघिण
४गेल्या बुधवारपासून म्हणजे २६ फेब्रुवारीपासून आपल्या चार बछड्यांसह ही वाघिण शेताच्या जवळच असलेल्या खोलगट भागात होती. शनिवारी सकाळपर्यंत या परिसरात ती वावरत होती. परंतु आता ती या भागातून इतरत्र गेली असावी, अशी माहिती प्रविण बोळकुंटवार यांनी दिली. चार दिवसांपासून ही वाघिण याच भागात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यामुळे ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.

Web Title: Agricultural jam in the Sunna-Dhoki area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल