दारव्हा येथे कृषी दिन, डॉक्टर डे निमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:55+5:302021-07-03T04:25:55+5:30
दारव्हा : येथे कृषी दिन आणि डॉक्टर डे निमित्त विविध संघटना, शासकीय कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ...
दारव्हा : येथे कृषी दिन आणि डॉक्टर डे निमित्त विविध संघटना, शासकीय कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी हरितक्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले.
डॉक्टर असोसिएशनच्या वतीने लढानगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन पोटफोडे, डॉ. मनोज राठोड, डॉ. नितीन भेंडे, डॉ. अमर चावके, डॉ. विनोद कदम, डॉ. गोपाल अग्रवाल, डॉ. कोमल सांगाणी, डॉ. रुचा पोटफोडे, डॉ. अश्विनी भेंडे, डॉ. वृषाली राठोड, समाधान आडे व नगरातील नागरिक उपस्थित होते.
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानायक वसंतराव नाईक चौक बसस्थानक येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. आडे ले-आऊटमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला बुलडाणा येथील महंत रायसिंग महाराज, डॉ. मनोज राठोड, समाधान आडे, भरत जाधव, अनिल मोहिते, दिलीप नाईक, श्याम राठोड, दयाराम जाधव, अमित राठोड, शेखर राठोड, रमाकांत चव्हाण, रघू राठोड आदी उपस्थित होते.
तहसील कार्यालयातही कृषी दिन साजरा करण्यात आला. कार्यालय परिसरात तहसीलदार सुभाष जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार संजय जाधव, रवी तुपसुंदरे, प्रकाश खाटीक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
020721\img-20210701-wa0021.jpg
डॉक्टर असोसिएशन चे पदाधिकारी वृक्षारोपण करताना