शेती अन् माती कधीच धोका देत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:46 AM2021-09-27T04:46:16+5:302021-09-27T04:46:16+5:30

फोटो उमरखेड : पोफाळीचे गावकरी तथा ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवर व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती कृषी शास्त्रज्ञ डॉ. ...

Agriculture is never a threat | शेती अन् माती कधीच धोका देत नाही

शेती अन् माती कधीच धोका देत नाही

Next

फोटो

उमरखेड : पोफाळीचे गावकरी तथा ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवर व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजय माने यांनी शेती आणि माती कधीच धोका देत नाही, असे सांगितले.

डॉ. माने म्हणाले, शेतीला जोड व्यवसायाचा समन्वय असल्यास शेती परवडते. त्यामुळे ज्वारीचा ब्रँड तयार करून उमरखेड ज्वारी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवू, असा संकल्प त्यांनी केला. गटशेती करुन उत्कृष्ट पध्दतीने जे बाजारात विकते ते पिकवले जाते. त्या पिकाची प्रोसेसिंग करून उत्कृष्ट भाव मिळून शेतकरी आर्थिक सत्ता प्राप्तीकडे जाऊ शकतो, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ विजय माने यांनी अंकुश पवार, धनजंय ठाकरे, प्रथमेश कोंढूरकर, विकास बरडे या विद्यार्थांना पुढील स्पर्धेसाठी मदत करण्याचा मानस व्यक्त केला. अध्यक्षस्थानी सदबाराव मोहटे होते. डॉ. वि. ना. कदम, संदीप ठाकरे, रवी शिलार, गणेश शिलार, सतीश नाईक, शंकर तालंगकर, माणिक क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते. प्रवीण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. निकेश गाडगे यांनी आभार मानले.

Web Title: Agriculture is never a threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.