अहिल्या जोशी ठरली ह्यवायपीएस आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:06 PM2020-11-09T21:06:31+5:302020-11-09T21:06:58+5:30

लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखविता यावी यासाठी वायपीएस आयडॉल स्पर्धा घेण्यात आली. ऑडिशनदरम्यान संगीत शिक्षक विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे आणि राजू कोलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत प्रतिभेचे निरिक्षण केले

Ahilya Joshi became HYPS Idol | अहिल्या जोशी ठरली ह्यवायपीएस आयडॉल

अहिल्या जोशी ठरली ह्यवायपीएस आयडॉल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
मधूर स्वर, ताल यांचा ताळमेळ साधत यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अहिल्या जोशी ही ह्यवायपीएस आयडॉलह्णची मानकरी ठरली. सेकंड रनरअप देवांशू हुळेकर ठरला. तर फर्स्ट रनरअपचा पुरस्कार पवित्रा इसराणी या विद्यार्थिनीने प्राप्त केला. निमित्त होते यवतमाळ पब्लिक स्कूलतर्फे आयोजित ऑनलाईन संगीत स्पर्धेचे.
लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखविता यावी यासाठी वायपीएस आयडॉल स्पर्धा घेण्यात आली. ऑडिशनदरम्यान संगीत शिक्षक विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे आणि राजू कोलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत प्रतिभेचे निरिक्षण केले. समापन राऊंडमध्ये साक्षी चव्हाण, पवित्रा इसराणी, अहिल्या जोशी, अभिषेक वाजपेयी, आकांक्षा देव, अवनिष बोराडे, देवांशू हुळेकर पोहोचले.
फेसबूक, यू-ट्यूब यावर समापन राऊंडचे प्रसारण करण्यात आले. परिक्षक म्हणून विदर्भ आयडॉल हेमंत भिसे, संगीत शिक्षक मनोज तिडके, ए.आर. रहमान इंस्टिट्यूट चेन्नईचे गीतकार आणि वायपीएसचे माजी विद्यार्थी राहुल उपलेंचवार लाभले होते. परिक्षकांनी आपला निर्णय जाहीर केला. अहिल्या जोशी वायपीएस आयडॉल ठरली.
समारोपीय कार्यक्रम शाळेच्या सभा भवनात पार पडला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनल शर्मा आदी उपस्थित होते. विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली. विशेष म्हणजे कला शिक्षक अभिजित भिष्म यांनी टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रॉफी तयार केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू विक्की कापसीकर यांनी सांभाळली. सीसीए प्रमुख अजय सातपुते यांच्या मार्गदर्शनात ओवेश सैयद, सानिया सोधी आदी विद्यार्थ्यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. साची भूत हिने आभार मानले. शाळा समन्वयक अर्चना कढव, रूक्साना बॉम्बेवाला आदींनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Ahilya Joshi became HYPS Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.