गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स पसरत नाही; धीर, मानसिक आधार दिल्याने त्याचे आयुष्य वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 10:15 PM2022-10-28T22:15:57+5:302022-10-28T22:16:22+5:30

व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याशिवाय इतर खबरदारी घेतल्यास बाधित व्यक्तीला मदत करता येते. रोगाचा प्रसार टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी निरोधचा वापर केल्याने एड्स धोका पूर्णत: टाळता येतो.

AIDS is not spread by kissing, eating together; Giving patience, mental support increases his life | गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स पसरत नाही; धीर, मानसिक आधार दिल्याने त्याचे आयुष्य वाढते

गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स पसरत नाही; धीर, मानसिक आधार दिल्याने त्याचे आयुष्य वाढते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एचआयव्ही व एड्स या रोगाचा संसर्ग वाढतो आहे. बाधितांमध्ये अपराधाची भावना निर्माण होऊ नये यासाठी बाधितांना धीर देण्याची गरज आहे. यातून ते सामान्य जीवन सहज जगू शकतात. शासनाकडून सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार मिळतो. योग्य आहार, विहार व नियमित औषधी या आधारावर बाधित व्यक्ती सर्वसामान्यांसारखे जीवन व्यतीत करू शकते.
व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याशिवाय इतर खबरदारी घेतल्यास बाधित व्यक्तीला मदत करता येते.

५३,५२० जणांची तपासणी झाली गत सहा महिन्यांत
५३ हजार ५२० सामान्य रुग्णांची एचआयव्ही तपासणी जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तीन एआरटी सेंटर कार्यान्वित आहेत.

याद्वारे पसरू शकतो एड्‌स

रोगाचा प्रसार टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी निरोधचा वापर केल्याने एड्स धोका पूर्णत: टाळता येतो.
याशिवाय रक्त घटक किंवा रक्त रुग्णाला देण्यापूर्वी त्याची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. बाधित रक्त दिल्यास संसर्गाचा धोका आहे.

२४७ एचआयव्ही बाधित आढळले
सहा महिन्यांत जिल्ह्यात एचआयव्हीचे २४७ नवीन बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
६१५९ बाधितांवर होतोय उपचार
एआरटी सेंटर व शासकीय रुग्णालयात ६ हजार १५९ बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

७ अल्पवयीन मुलेही बाधित
एचआयव्ही संसर्गाचा विळखा आता अल्पवयीन मुलांपर्यंतही पोहोचला आहे. हा आजार हळूहळू पसरत आहे. याला प्रतिबंध हाच यावरचा प्रमुख उपचार आहे. त्यामुळे एडस् होऊ नये यासाठीची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करावा. तपासणी झालेल्या रुग्णांमध्ये ७ अल्पवयीन मुले पाॅझिटिव्ह आली आहेत.

वाळीत टाकू नका, गळाभेट घ्या...
एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्याच्यासोबत राहिल्यास, सहवासात असल्यास कुठलाही धोका होत नाही. या उलट आजाराच्या काळात अशा बाधित व्यक्तीला सोबत राहून मानसिक आधार, धीर दिल्यास तो लवकर त्यातून बरा होऊ शकतो. आजार नियंत्रणात राहू शकतो.

आरोग्य शिक्षण हाच एकमेव मार्ग
एचआयव्ही व एड्स यावर लस उपलब्ध नाही. प्रतिबंध हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठी आरोग्य शिक्षण महत्त्वाचा मार्ग आहे. जनतेला एड्सबाबत अद्ययावत माहिती देऊन जनजागृती करता येते व रोगाचा प्रसार टाळता येतो.
- डाॅ. प्रीती दास, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी

 

Web Title: AIDS is not spread by kissing, eating together; Giving patience, mental support increases his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :HIV-AIDSएड्स