नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 09:45 PM2019-01-13T21:45:55+5:302019-01-13T21:46:28+5:30

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

Air quality standards are also produced by innovative materials | नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’

स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राच्या कक्षा अधिक रुंदावत आहेत, तंत्रज्ञानातील सृजनशीलतेचा वापर आपण केला पाहिजे मात्र तो करत असताना या नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी दुपारी ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी, मोहिनी मोडक, प्रा. क्षितीज पाटुकले उपस्थित होते. याप्रसंगी, प्रा.क्षितीज पाटुकले म्हणाले की, आपल्या साहित्याला प्राध्यापकीय धाटणीतून बाहेर काढण्याचे काम तंत्रज्ञान करत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला शस्त्र मानून सर्वच क्षेत्रात त्याचा वापर केला पाहिजे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जागतिक पातळीवर प्रकाशन संस्था कोसळत आहेत, अशी ओरड होत आहे. मात्र या क्षेत्राचा सकारात्मक पद्धतीने विचार आणि अवलंबन केले पाहिजे. साहित्यिक आणि प्रकाशक ही यातील संवादाची दरी दूर करण्यासाठी साहित्यिकाने अद्ययावत झाले पाहिजे. साहित्यिकांनी आपले साहित्य ‘रेडी टू प्रिंट’ स्वरुपात प्रकाशकाकडे नेले पाहिजे, जेणेकरुन प्रकाशकावरील भारही कमी होईल आणि साहित्यिकाकडे आपले साहित्य ई- माध्यमात उपलब्ध होईल. अजूनही आपल्याकडे साहित्यविश्वातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या जाणिवेचा अभाव आहे, ही दुर्दैवी बाब आहे. या उलट साहित्यिकांनी असा विचार केला पाहिजे की, तंत्रज्ञानामुळे साहित्यिक सक्तीने पर्यावरणस्नेही होईल ही स्वागर्ताह बाब आहे. पूर्वी कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा कोणत्याही घटना, घडामोडींविषयी व्यक्त होण्याची जी भीती होती ती आता तंत्रज्ञानाने पुसून टाकली आहे. तसेच, वाचनसंस्कृतीच्या विस्तारासाठीही तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहाय्याने अनेक प्रयत्न होत आहेत. एकंदरित, तंत्रज्ञान क्षेत्राविषयी नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेचा विचार केला पाहिजे.

‘कॉपी पेस्ट’ साहित्यिकांची संख्या वाढतेय
यावेळी, मोहिनी मोडक म्हणाल्या की, कवितेतला ‘क’सुद्धा माहीत नसणारे कवी सध्या अरुणा ढेरे यांनी व्यक्त व्हावे की नाही याविषयी चर्चा करतात तेव्हा त्या व्यक्त होण्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. तंत्रज्ञानामुळे ‘कॉपी पेस्ट’ करणाºया साहित्यिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, ही चिंतेची बाब आहे. इंग्रजी साहित्य क्षेत्राच्या तुलनेत मराठी साहित्य विश्वात अधिकाधिक डिजिटलायझेशन होण्याची गरज आहे. शिवाय, तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग सातत्याने होत आहेत, त्याला वाचकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे.
चर्चेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि साहित्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवीन प्रयोग होत आहेत, मात्र त्यात आपण बरेच मागे आहोत. चीन आणि जपानमध्ये एखाद्या रोबोच्या माध्यमातून सृजनशील साहित्य निर्माण करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. परंतु, आपल्याकडे मात्र अजून तरी साहित्य व लेखकांचे लिहिते होण्याचे काम त्यांच्या हातून जाणार नाही, अशीच परिस्थिती आहे. एकंदरित नवतंत्रज्ञान आणि साहित्य क्षेत्राचा माणूस हाच केंद्रबिंदू असावा.

बहिष्कारामुळे केवळ तीनच वक्ते
नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या मुद्द्यामुळे या चचेर्तील अतुल कहाते, बालाजी सुतार, डॉ.अजय देशपांडे, श्रीकांत बोजेवार, समन्वयक किरण येले हे अनुपस्थित होते. त्यामुळे केवळ तीन वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले.

युवापिढीने फिरवली पाठ
नवंतत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा हा विषय तरुणपिढीशी संलग्न असल्याने या चर्चेला तरुण साहित्यप्रेमींनी आवर्जून हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने युवापिढीने या चर्चेकडे पाठ फिरवल्याने केवळ जुन्या पिढीतील साहित्य रसिकांनी येथे उपस्थिती दर्शविली होती.

Web Title: Air quality standards are also produced by innovative materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.