सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी, पिण्यासाठी नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 05:00 AM2021-04-25T05:00:00+5:302021-04-25T05:00:11+5:30

सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन डॉ.भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

The alcohol in the sanitizer is for health, not for drinking | सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी, पिण्यासाठी नव्हे

सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी, पिण्यासाठी नव्हे

Next
ठळक मुद्देदिलीप पाटील भुजबळ : वणीत सहा मृतकांच्या घरी पोलीस अधीक्षकांनी दिली भेट, सखोल आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. त्यात असलेले अल्कोहाेल हे केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे, त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले. 
सॅनिटायझर प्राशन केल्याने वणीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शनिवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आढावाही घेतला. 
यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, वणी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.भालचंद्र आवारी सोबत होते. सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन डॉ.भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

 

Web Title: The alcohol in the sanitizer is for health, not for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस