यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रेत्याचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप, पोलिसांकडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:22 PM2020-02-04T14:22:26+5:302020-02-04T14:23:50+5:30

गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Alcohol vendor dies in Yavatmal district; Relatives accuse police, refusal of police | यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रेत्याचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप, पोलिसांकडून नकार

यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रेत्याचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप, पोलिसांकडून नकार

Next
ठळक मुद्देपत्नी व नातेवाईकांचा आक्रोशठाणेदार म्हणतात, एसडीपीओ पथकाची संयुक्त कारवाई

हरिओम बघेल
यवतमाळ : गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
महेंद्र देवराव गायकवाड (३५) रा. इचोरा ता. आर्णी असे मृताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांचे एक पथक सावळी सदोबा परिसरातील इचोरा गावात दारू पकडण्यासाठी आले होते. महेंद्रच्या घरीसुद्धा दारू विकली जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यामुळे या पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळविला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच महेंद्र गावात पळत सुटला. पोलिसांनीही त्याचा बराच दूर पाठलाग केला. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. यावेळी बेशुद्ध झालेल्या महेंद्रला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मारहाणीमुळे महेंद्रचा गावातच जागीच मृत्यू झाला होता, त्याच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्रची पत्नी विद्या गायकवाड हिने केली आहे. महेंद्रला मृत घोषित करताच त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर एकच आक्रोश केला. महेंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

महेंद्रवर दारूच्या अनेक केसेस - ठाणेदार चौधर
सदर प्रतिनिधीने, संबंधित पारवा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधला असता, पांढरकवडा, घाटंजी व पारवा पोलीस ठाण्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची दारू, जुगाराविरुद्ध संयुक्त कारवाई केली जात होती, असे त्यांनी सांगितले. महेंद्रवर यापूर्वी अनेकदा दारूच्या केसेस दाखल करण्यात आल्या. परंतु प्रत्येक वेळी तो पळून जात होता. मंगळवारीसुद्धा तो पळून गेला. मात्र त्याला पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठाणेदार चौधर यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Alcohol vendor dies in Yavatmal district; Relatives accuse police, refusal of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस