रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:20 PM2018-09-29T21:20:42+5:302018-09-29T21:21:16+5:30

भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे.

Alert of movement for the road | रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे.
तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून कान्हाळगावची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या भागातील गावांना रस्ते नाही. या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्यानंतर मात्र पुढील शिक्षणासाठी मारेगाव येथे जावे लागते. परंतु तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. २० वर्षापूर्वी या रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु आजतागायत रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी बिकट झाला आहे. या रस्त्याने पायदळ चालणेदेखिल कठीण झाले आहे.

Web Title: Alert of movement for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.