पुसदमधील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:58+5:302021-05-08T04:43:58+5:30
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहे. कोरोनापासून स्वतः आणि तालुक्यातील जनतेचा बचाव करायचा असल्यास शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे अत्यंत ...
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहे. कोरोनापासून स्वतः आणि तालुक्यातील जनतेचा बचाव करायचा असल्यास शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही व्यापारी आस्थापना ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करतात. अत्यावश्यक सेवेअंतर्गत न येणाऱ्या अस्थापना सुरू राहतात. यासंदर्भात पुसद चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची आमदार इंद्रनील नाईक, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विविध सूचना देण्यात आल्या. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ज्यांना परवानगी नाही, असे दुकान उघडू नये, ज्यांना परवानगी आहे अशांनी वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन करण्यात आले. जे नियम मोडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी व्यक्त केली.