उमरखेड तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांची दमछाक

By admin | Published: December 26, 2016 01:54 AM2016-12-26T01:54:32+5:302016-12-26T01:54:32+5:30

लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा तालुक्यात ज्वर चढला आहे.

All the leaders of the party in Umarkhed taluka tension | उमरखेड तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांची दमछाक

उमरखेड तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांची दमछाक

Next

जिल्हा परिषद निवडणूक : संभाव्य उमेदवारांनी केला प्रचार सुरू
उमरखेड : लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा तालुक्यात ज्वर चढला आहे. उमरखेड तालुक्या सहा जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समिती सदस्य आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेना अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चिन्ह आहे.
उमरखेड तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत. यामध्ये मुळावा, पोफाळी, ढाणकी, निंगणूर व विडूळ यांचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेसचे सदस्य आहेत. तर दराटीमध्ये भाजपाने यश मिळविले होते. पंचायत समिती सदस्य एकूण १२ आहेत. त्यामध्ये मुळावा, बेलखेड, पोफाळी, सुकळी, विडूळ, ढाणकी, निंगणूर यामध्ये कॉंग्रेसचे तर ब्राह्मणगाव, कुरळी व चातारी या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. बिटरगाव भाजपा तर दराटी मनसेच्या ताब्यात आहेत. हे सर्व राजकीय समिकरण पाच वर्षांपूर्वीचे आहे. आज मात्र परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष व त्यांच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून उमरखेड तालुक्यातील ढाणकी, मुळावा, पोफाळी, दराटी, निंगणूर, विडूळ या जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक गावांमध्ये काँग्रेसने आपली बाजू भक्कम करण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. माजी आमदार अ‍ॅड़ अनंत देवसरकर व विजय खडसे सोबतच तातू देशमुख, राम देवसरकर, दत्तराव शिंदे, रमेश चव्हाण आदी मोठे नेते बैठका घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी मिळालेले यश आजही राखून ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री व आमदार मनोहरराव नाईक यांनी उमरखेड तालुक्याच्या सर्व भागात दौरा केला. यामध्ये निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उत्तमराव राठोड, भीमराव चंद्रवंशी, कल्याणराव माने, आशाताई देवसरकर, बालाजी वानखडे, ख्वॉजाभाई, बळवंतराव चव्हाण, उत्तमराव जाधव, बालाजी डाखोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.
भाजपा आमदार राजेंद्र नजरधने यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत अध्यक्ष व सात नगरसेवक निवडून आणून भाजपाची सत्ता स्थापन केली आहे. आता त्यांच्यासमोर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी उत्तमराव इंगळे, सतीश वानखेडे, अ‍ॅड़ माधवराव माने यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभत आहे. परंतु भाजपामध्ये विविध प्रकारची नाराजी आहे, त्याचाही सामना करावा लागणार आहे. सेनेची मोठी जाबाबदारी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यावर असून, त्यांनी उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसैनिकांसोबत अनेक बैठका घेणे सुरू केले आहे. संभाव्य उमेदवार प्रत्येक मतदारसंघात फिरताना दिसत आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीत चांगली कसरत करावी लागणार आहे. त्यावरच त्या पक्षाचे भवितव्य ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)

संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
अनेक प्रमुख पक्षांनी नगर परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. तर काहींना जेमतेम यश मिळाले. या सर्वांनी आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकडे संधी म्हणून पहायचे ठरविले आहे. त्यामुळे ही संधी कोणत्याही परिस्थितीत दडविल्या जाऊ नये, यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. पक्षातील मोठे नेते यावेळी कोणतीही चूक करण्याच्या मनस्थितीत नाहीत. म्हणूनच योग्य रणनिती आखून प्रचार, प्रत्यक्ष भेटी-गाठी यावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते.

Web Title: All the leaders of the party in Umarkhed taluka tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.