कर्जमुक्तीच्या रांगेत सव्वा लाख शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:07+5:30

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे सव्वा लाख शेतकरी राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्याकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहेत.

All the one million farmers in the debt-free range | कर्जमुक्तीच्या रांगेत सव्वा लाख शेतकरी

कर्जमुक्तीच्या रांगेत सव्वा लाख शेतकरी

Next
ठळक मुद्दे७२२ कोटींच्या थकबाकीचे अंकेक्षण : थकबाकीदारांना दिलासा

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या थकबाकी खात्यांची नोंद झाली आहे. निकषानुसार या खात्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहे. या याद्यांचे अंकेक्षण करण्यासाठी बँकांनी लेखा परिक्षकांकडे या सुपूर्द करण्याचे काम सुरू केले आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे सव्वा लाख शेतकरी राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्याकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहेत.
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी तयार करून अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षकाकडे सादर केल्या आहेत. १५ जानेवारीपर्यंत कर्जमाफीतील शेतकऱ्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर १ फेब्रुवारीला कर्जमुक्तीच्या यादीत समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे नाव पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहेत. या याद्यातील शेतकऱ्यांच्या विशेष नंबरवर प्रसिद्ध झालेल्या खात्याला शेतकऱ्यांना थम्बद्वारे अप्रूव्हल द्यायचे आहे. यानंतर कर्ज प्रक्रिया अंतिम होणार आहे.
तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नाही, त्या शेतकऱ्यांच्या याद्या १५ जानेवारीपर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये या याद्या लावल्या जात आहेत. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, बँका, तलाठी कार्यालयात याद्या लावल्या जाणार आहेत.

आधार लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले खाते आधार लिंक करावे. यामुळे कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत अशा शेतकऱ्यांना सहभागी करता येणार आहे. कर्जमुक्ती प्रक्रियेचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे.
- अर्चना माळवे
जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

Web Title: All the one million farmers in the debt-free range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.