Pulwama Terror Attack : दिग्रसमध्ये सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा, शहरात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:49 PM2019-02-16T14:49:02+5:302019-02-16T14:53:05+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
दिग्रस (यवतमाळ) - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहिदांना श्रद्धांजली आणि भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व धर्मियांनी मोर्चा काढला. यावेळेस पाकिस्तानचा झेंडा जाळून 'भारत माता की जय' अशी घोषणाबाजी करण्यात आली.
शहिदांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. दरम्यान, येथील सर्व शाळा महाविद्यालय, बाजारपेठ आणि सर्व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. हा निषेध मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व धर्मिय आणि भारतीयांचा असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.