वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदाही सर्व मूर्तिकार पोस्टल ग्राऊंडमध्येच
By admin | Published: September 16, 2015 03:04 AM2015-09-16T03:04:59+5:302015-09-16T03:04:59+5:30
स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती बाजारात ओळखता याव्या म्हणून प्रशासनाने पोस्टल ग्राउंड खुले ठेवले आहे.
गणेशभक्तांची मांदियाळी : स्थानिक मूर्तिकारांचा पुढाकार
यवतमाळ : स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती बाजारात ओळखता याव्या म्हणून प्रशासनाने पोस्टल ग्राउंड खुले ठेवले आहे. दोन दिवस मूर्तिकार या ठिकाणी मूर्तीची विक्री करणार आहे. त्यासाठी मूर्तिकार संघटनेने पोस्टल ग्राउंड बुक केले आहे. १६ आणि १७ तारखेला पोस्टल ग्राउंडवर मूर्तिकारांच्या मूर्ती उपलब्ध होणार आहे.
गणेश उत्सवाच्या पर्वावर चौका-चौकामध्ये गणरायाच्या मूर्ती विकल्या जातात. यातून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. हा अडथळा टाळण्यासोबत स्थानिक मूर्तिकरांच्या मूर्ती विकता याव्या म्हणून पोस्टल मैदान दिले जाते. गत काही वर्षांपासून यवतमाळात या परंपरेला प्रारंभ झाला.
यामुळे स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्तीला चांगला वाव मिळाला. लालमातीच्या मूर्ती विकता आल्या. यावर्षीही मूर्तिकार संघटनेच्या पुढाकारातून दोन दिवस मैदान बुक करण्यात आले. या ठिकाणावरून १६ आणि १७ सप्टेंबरला मूर्ती विकल्या जाणार आहेत. (शहर वार्ताहर)