‘मेडिकल’चे सर्वच वाॅर्ड हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:02+5:30
विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापासून इमारत बांधकामाचा रखडलेला निधी अद्याप पावेतो मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटदारानेही नाईलाजास्तव कामाची गती मंद केली आहे. महामारीचे संकट असताना केवळ थोड्या कामासाठी तयार इमारत वापरता आणता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात ८९ खाटा उपलब्ध आहेत. तेथे १८९ बालक उपचारार्थ दाखल आहेत. मुलांमध्ये व्हायरल फिवर, डेंग्यू सदृश ताप ही आजाराची लक्षणे आहेत. याचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यासोबतच मेडिसीन, स्त्रीरोग विभाग पूर्णत: हाऊसफुल्ल झाला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या इमारतीत असलेला बालरोगचा वॉर्ड पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न मेडिकल प्रशासन करीत आहे. नव्या २८८ खाटांचे स्त्री रुग्णालय व बालरोग
विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापासून इमारत बांधकामाचा रखडलेला निधी अद्याप पावेतो मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटदारानेही नाईलाजास्तव कामाची गती मंद केली आहे. महामारीचे संकट असताना केवळ थोड्या कामासाठी तयार इमारत वापरता आणता येत नाही. ही अडचण शासन स्तरावर सोडविणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळातही रुग्णालयाचा निधी तातडीने मिळण्यासाठी पाठपुरावा झाला, प्रतिसाद मात्र मिळाला नाही.
तब्बल सहा कोटी ५० लाखांची देयके रखडली असल्याने हे काम थांबले असल्याचे सांगितले जाते. रुग्णालयाची इमारत वेळेत पूर्ण व्हावी याचा कोविड काळात सातत्याने पाठपुरावा केला जात होता. नंतर मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या बालरुग्ण विभागात एका बेडवर तीन ते चार बालकांना ठेवण्याची वेळ आली आहे. याशिवाय इतरही विभागाचे वॉर्ड पूर्णत: भरलेले आहेत. बरेचदा जागा उपलब्ध होत नसल्याने दाखल होऊन उपचार घेण्याची गरज असलेल्या रुग्णांनासु्द्धा परत जावे लागत आहे.
कंत्राटदाराची जवळपास साडेतीन कोटींचे देयके थकली आहे. मात्र त्यानंतरही अत्यावश्यक सेवा म्हणून फेज-३ मधील बालरोग वाॅर्ड पूर्णत: तयार झाला आहे. तो केव्हाही वापरात घेऊ शकतात. इमारतीची केवळ बाह्य छपाईचे काम सुरू आहे. पैसे नसल्याने कंत्राटदाराने कामाची गती कमी केली आहे.
- मुकुंद कचरे
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, यवतमाळ