आदिलाबाद येथे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना पुनर्वसनासाठी मदतीचे वाटप
By admin | Published: November 15, 2015 01:42 AM2015-11-15T01:42:51+5:302015-11-15T01:42:51+5:30
आदिलाबाद जिल्ह्यातील १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना तेलंगाणा सरकारच्यावतीने पुनर्वसनासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या सानुग्रह धनादेशाचे वाटप करण्यात आले.
आदिलाबाद : आदिलाबाद जिल्ह्यातील १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना तेलंगाणा सरकारच्यावतीने पुनर्वसनासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या सानुग्रह धनादेशाचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांना उद्योगधंदे सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. जगमोहन आणि पोलीस अधीक्षक डॉ. तरुण जोशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच किराणा दुकान व आॅटोरिक्षासाठी मदत केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जगमोहन यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. तरुण जोशी यावेळी म्हणाले, जिल्ह्यात नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे. आदिवासींनी नक्षलवाद्यांच्या आमिषाला बळी न पडता सन्मानाने जगावे. या कार्यक्रमात आत्मसमर्पण करणारे कोरटे मदनय्या, पेंदोर शंभू, आडे प्रभू, तलांडे कांता, आत्राम जंगू, कुडमेथे लालशा, पेंदोर शंकर, सिडाम लक्ष्मण, अरशा पोशम, आडे गंगुबाई, शेडमाके मंगुबाई, सिडाम महादू, सादुला पद्मा यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला. (प्रतिनिधी)