शाळेसोबतच लोकवाहिनीच्या 38 फेऱ्या विविध मार्गांवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:26+5:30

दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी आदी मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यावर भर राहणार आहे. शाळा सुरू झाल्याने आणि दिवाळी तोंडावर असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.

Along with the school, 38 rounds of Lokvahini started on various routes | शाळेसोबतच लोकवाहिनीच्या 38 फेऱ्या विविध मार्गांवर सुरू

शाळेसोबतच लोकवाहिनीच्या 38 फेऱ्या विविध मार्गांवर सुरू

Next

विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यामंदिर सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होऊ नये, यासाठी लोकवाहिनी सज्ज झाली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थी या माध्यमातून शहर आणि लगतच्या शाळांमध्ये पोहोचत आहे. महामंडळाने मानव विकास मिशनच्या २७ बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थिनी शाळेत पोहोचत आहे. शिवाय शालेय विद्यार्थ्यांकरिता ११ बसेस विविध मार्गांवर सुरू झाल्या. 
दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी आदी मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यावर भर राहणार आहे. शाळा सुरू झाल्याने आणि दिवाळी तोंडावर असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.

यवतमाळ-पुणे बसफेऱ्या पुढील काळात धावणार
कोरोनामुळे बंद असलेल्या यवतमाळ-पुणे बसफेऱ्या दिवाळीपासून धावणार आहे. सध्या उमरखेड-नगर ही लांबपल्ल्याची बसफेरी नागरिकांना सेवा देत आहेत.
विद्यार्थ्यांना मासिक पासचे वाटप
- शाळांकडून याद्या घेऊन विद्यार्थ्यांना एसटी पास दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शाळेच्या ठिकाणी जाण्यासाठीची सोय विद्यार्थ्यांना झाली आहे. 
- आवश्यकतेनुसार पुढील काळात शाळांच्या वेळेवर बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे. यासाठीचे नियोजन केले जात आहे.
गर्दीचा अंदाज घेऊन फेऱ्या वाढविणार
विद्यार्थ्यांच्या पासेस तयार होतील, त्यानुसार बसची संख्या वाढविली जाणार आहे. दिवाळी तोंडावर आलेली आहे. गर्दीचा अंदाज घेऊन बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, नांदेड, परभणी आदी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. 
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ

शिवशाहीच्या फेऱ्याही वाढणार

- विविध मार्गांवर शिवशाही बसच्या फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन यवतमाळ विभागाकडून केले जात आहे. 
- यवतमाळ-अमरावती मार्गावर २१ शिवशाही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढताच यासाठीचा निर्णय होणार आहे.

Web Title: Along with the school, 38 rounds of Lokvahini started on various routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.