अंबाळीच्या महिलांची पोफाळी ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:24 PM2019-09-02T21:24:09+5:302019-09-02T21:26:25+5:30

अंबाळीसह परिसरातील जनुना, पळशी, नागापूर, गगनमाळ, तरोडा, शिळोणा, गौळ, धनज, मोहदरी, मुळावा, वानेगाव आदी ठिकाणी हातभट्टीच्या दारू व्यवसायाला उधाण आले आहे. स्वस्तात मिळणाऱ्या या दारूकडे मजूर वळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. महिलांना अनेकदा मारही खावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी दारूविरुद्ध एल्गार पुकारला.

Ambali village women gone in police station | अंबाळीच्या महिलांची पोफाळी ठाण्यावर धडक

अंबाळीच्या महिलांची पोफाळी ठाण्यावर धडक

Next
ठळक मुद्देदारूविरुद्ध एल्गार : अवैध व्यवसाय वाढले, मटका जुगाराला जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील पोफाळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अंबाळी येथे अवैध दारू विक्रीसह मटका, जुगाराला जोर चढला आहे. याविरुद्ध महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदारांना दारूबंदीसाठी अल्टीमेटम दिला.
अंबाळीसह परिसरातील जनुना, पळशी, नागापूर, गगनमाळ, तरोडा, शिळोणा, गौळ, धनज, मोहदरी, मुळावा, वानेगाव आदी ठिकाणी हातभट्टीच्या दारू व्यवसायाला उधाण आले आहे. स्वस्तात मिळणाऱ्या या दारूकडे मजूर वळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. महिलांना अनेकदा मारही खावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी दारूविरुद्ध एल्गार पुकारला.
महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला. त्यानंतर रविवारी थेट पोफाळी ठाणे गाठून ठाणेदारांना दारूबंदीसाठी निवेदन दिले. त्वरित अवैध दारू विक्री बंद न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी निवेदनातून दिला. यावेळी सरपंच सुनंदा हनवते, तानाजी चंद्रवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष अविनाश यादवकुळे, रणजीत हनवते, अनिता दामोदर, सुनीता बोडखे, मीरा हनवते, कमल जाधव, सुशीला खंदारे, ध्रुपतबाई शिंदे आदी उपस्थित होत्या. ठाणेदार कैलास भगत यांनी अवैध धंदे बंद करण्याची ग्वाही दिली.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
उमरखेडधील मटका, जुगार चालकांनी पोफाळी परिसरात पाय पसरले आहे. अनेक गावात त्यांनी मटका, जुगार सुरू केला आहे. पोफाळी परिसर मराठवाडा सीमेलगत असल्याने मटका, जुगाराला उधाण आले आहे. त्याचा सामान्य जनतेला त्रास होत आहे. मात्र पोलिसांना दारूसह मटका, जुगार अड्डे दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Ambali village women gone in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.