चित्रकार बळी खैरे यांना आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:09+5:302021-07-30T04:44:09+5:30
यवतमाळ : युगकवी मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त ‘आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार’ येथील चित्रकार व कवी बळी ...
यवतमाळ : युगकवी मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त ‘आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार’ येथील चित्रकार व कवी बळी खैरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३१ जुलै रोजी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. सुनील सारीपुत्त राहतील. आंबेडकरी विचारवंत डॉ. वामन गवई यांच्या हस्ते पुरस्कार कवी खैरे यांना प्रदान केला जाईल. ‘संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी दूर जाणारे राजकारण आणि भारतीय लोकशाहीचे भविष्य’ या विषयावर यावेळी परिसंवाद होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख प्रकाश दार्शनिक, केंद्रीय सदस्य सुदाम सोनुले, डॉ. दीपक ठमके, अभियंता प्रशांत ठमके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समता सैनिक दल, युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठान व समता संगर प्रकाशनने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कवी खैरे यांचे समता सैनिक दलाच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रोग्रामर कमिटी सदस्य प्रा. प्रकाश दातार, जिल्हा संघटक चंदू मून, जयप्रकाश चव्हाण, अमोल भोसले, विवेक कांबळे, विवेक वानखेडे आदी उपस्थित होते.