आंबेडकरवादी संघटनांचे निवेदन

By admin | Published: January 21, 2016 02:19 AM2016-01-21T02:19:54+5:302016-01-21T02:19:54+5:30

हैदराबाद विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणारा रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर

Ambedkarist organizations' request | आंबेडकरवादी संघटनांचे निवेदन

आंबेडकरवादी संघटनांचे निवेदन

Next

विद्यार्थी आत्महत्याप्रकरण : कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
यवतमाळ : हैदराबाद विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणारा रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरवादी संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य रामचंद्र राव, कुलगुरू आप्पाराव पोडिले आणि अभाविपचे सुशील कुमार व कृष्णा चैतन्य यांना तत्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून अ.जा. व अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, चार विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पूर्ववत प्रवेश द्यावा, रोहित वेमुला याच्या थकीत फेलोशीपची रक्कम आणि शासकीय मदत रुपये ५० लाख त्याच्या कुटुंबीयांना द्यावी, एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्या, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात तत्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करताना नॅशनल आंबेडकराईट गार्डचे (नाग) आनंद गायकवाड, समता सैनिक दलाचे धम्मा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे धर्मपाल माने, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे प्रा. के.डी. भगत, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे नामदेव स्थूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनचे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, बहुजन रिप. सोशॅलिस्ट पार्टीचे सुनील पुनवटकर, दशरथ मडावी, बळी खैरे, म.ना. गजभिये, नवनीत महाजन, धनंजय गायकवाड, अ‍ॅड. गोविंद बन्सोड, गोविंद मेश्राम, रमेश जीवने, श्रीकांत खोब्रागडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ambedkarist organizations' request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.