पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यात ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:14+5:302021-06-18T04:29:14+5:30

अभाविप संपूर्ण विदर्भात २५ जूनपर्यंत ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ‘अभाविप’चे कार्यकर्ते थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरण, ...

'Amhi Gramrakshak' campaign in Pusad, Umarkhed, Mahagaon, Arni talukas | पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यात ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान

पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यात ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान

Next

अभाविप संपूर्ण विदर्भात २५ जूनपर्यंत ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ‘अभाविप’चे कार्यकर्ते थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती करणार आहेत. हे अभियान पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यांमधील १८ गावांतील दोन हजार परिवार व पाच हजार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. यात ४० कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भात लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल. ‘देश हमें देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सिखें’ या भावनेने ‘अभाविप’च्या या महाअभियानात समाजातील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ प्रांत सहमंत्री अक्षय फुलारी, पुसद जिल्हा संयोजक धीरज शिंदे, उमरखेड नगरमंत्री सौरभ श्रीवास्तव, पुसद नगरमंत्री आदिराज सोळंके, आदींनी केले आहे.

Web Title: 'Amhi Gramrakshak' campaign in Pusad, Umarkhed, Mahagaon, Arni talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.